काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली, राहुल गांधींची पुण्यातील डॉक्टरांशी चर्चा

0
568
छायाचित्रः ट्विटर

पुणेः कोरोनाची बाधा झालेले काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती खालावली आहे. सातव यांची प्रकृती खालावल्याचे कळताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जहांगीर रुग्णालयाच्या डॉक्टरांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली आणि सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

२२ एप्रिल रोजी सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यानंतर मी कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली. नजीकच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे, असे सातव यांनी ट्विट करून म्हटले होते.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर राजीव सातव पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करून जहांगीर रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा