‘दम असेल तर जीडीपी रोजगार वाढवा, दाढी-मिशा तर कुणीही वाढवू शकतो!’

0
604
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. जीडीपी घसरला आणि लक्षावधी लोकांच्या हातचा रोजगार हिरावला गेला आहे. याच मुद्यावरून काँग्रेसने मोदींना लक्ष्य करत रोजगार आणि जीडीपी वाढवून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. त्यासाठी मोदी यांनी वाढवलेल्या दाढी-मिशांचेच उदाहरण देण्यात आले आहे.

लॉकडाऊन लागू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाढी-मिशा वाढवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा लूक बदलेला आहे. नेमके हेच हेरत काँग्रेस नेते राजीव सातव यांनी ‘दम असेल तर जीडीपी, रोजगार वाढवा, दाढी-मिशा तर कुणीही वाढवू शकतो,’ अशा शब्दांत मोदींवर निशाणा साधला आहे. सातव यांनी या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा सगळा रोख मोदींच्याच दिशेने आहे.

राजीव सातव यांच्या या ट्विटवर साधक-बाधक चर्चाही सुरू झाली आहे. दाढी- मिशा वाढवून टागोर बनण्याच्या नादात शेठजी आसाराम दिखने लगे है, अशी खोपरखळी चैतन्य पुरंदरे यांनी मारली आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा वृद्धीदर नकारात्मक राहणार असल्याचा अंदाज इंडिया रेटिंग्जने व्यक्त केला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर जगात दुसऱ्या क्रमांकावर होता. तो यंदा प्रथमच नकारात्मक राहणार असून मागील ४१ वर्षांतील तो निचांकी वृद्धीदर असेल, असे इंडिया रेटिंग्जने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा