प्यारे भारतवासियों, गुरूपोर्णिमेला चौकीदाराला गुरू मानू नका, अन्यथा आईला रांगेत उभे कराल!

0
97
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः आज सर्वत्र गुरूपोर्णिमा साजरी केली जात असतानाच तेच औचित्य साधून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘ प्यारे भारतवासियों, गुरूपोर्णिमेच्या दिवशी कृपया चौकीदाराला आपला गुरू मानू नका, अन्यथा आईला रांगेत उभे कराल आणि जीवनभर खोटे बोलाल, असे ट्विट करत सावंत यांनी मोदींना सणसणीत टोला लगावला आहे.

आज गुरूपोर्णिमेनिमित्त प्रत्येक जण शुभेच्छा देऊन आपल्या गुरूप्रति कृतज्ञता व्यक्त करत आहे. प्रत्येकाच्याच जीवनात गुरूचे स्थान अढळ आणि मोठे आहे. मात्र गुरूपोर्णिमेचे हेच औचित्य साधून सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये थेट मोदींचे नाव घेतले नाही, मात्र त्यांचा सगळा रोख मोदींकडेच आहे.

‘प्यारे भारतवासियों, गुरूपोर्णिमेच्या दिवशी कृपया चौकीदाराला आपला गुरू मानू नका. अन्यथा कोट्यवधी रुपयांचे आभूषण आणि वस्त्रे घालाल परंतु आईला रांगेत उभे कराल, जीवनभर खोटे बोलाल, जनतेची दिशाभूल कराल, द्वेष पसरवाल, गरिबांचा घास हिरावून घ्याल आणि अदानी- अंबानींचे घर भराल,’ असे सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा