ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसचा राजीनामा, मध्य प्रदेशतील कमलनाथ सरकार धोक्यात

1
420
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः ऐन धुळवडीच्या दिवशी मध्य प्रदेशात राजकीय धुळवड चांगलीच रंगली असून या धुळवडीचे रंग राजधानी दिल्लीतही उधळले जात आहेत. काँग्रसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जा आहे.

मध्य प्रदेशातील सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप राबवत असलेल्या ऑपरेशन लोटस मोहिमेला धुळवडीच्या दिवशीच रंगत आली आहे. कालपासूनच ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असलेले १७ आमदार नॉटरिचेबल झाले होते. त्यातच आज शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचा राजीनामा दिला. गेल्या १८ वर्षांपासून मी काँग्रेसचा प्राथमिक सदस्य आहे. आता ते सोडून देण्याची हीच योग्यवेळ आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझे राज्य आणि देशाची सेवा करणे हे माझे प्रारंभापासूनच ध्येय राहिले आहे. परंतु या पक्षात राहून मी ते करू शकत नाही. माझी जनता आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या सुरूवात करणे हाच एक उत्तम मार्ग असल्याचे मला वाटते, असे शिंदे यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. या राजीनाम्यानंतर शिंदे आता भाजपमध्ये जातात की आणखी कोणते पाऊल उचलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा