‘सोनिया गांधी, राहुल गांधींचे नागरिकत्व लवकरच रद्द होणार, फाइल गृहमंत्री अमित शहांच्या टेबलावर’

0
1094
संग्रहित छायाचित्र.

हैदराबादः काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नागरिकत्व लवकरच रद्द होईल. त्याबाबतची फाइल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टेबलावर आहे, असा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

हैदराबाद विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित ‘सीएए- समकालीन राजकारणापलीकचा ऐतिहासिक निर्णय’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. फाइल गृहमंत्री अमित शहा यांच्या टेबलावर आहे आणि लवकरच ते त्यांचे नागरिकत्व गमावतील, असा दावा स्वामी यांनी केला आहे. द हिंदूने हे वृत्त दिले आहे.

भारतीय संविधानाचा हवाल देऊन सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, भारतीय नागरिकत्व असताना अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या लोकांचे भारतीय नागरिकत्व आपोआपच रद्द होईल. राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले असल्याचा दावाही स्वामी यांनी केला आहे. परंतु राहुल गांधी यांचे वडिल राजीव गांधी भारतीय असल्यामुळे ते भारतीय नागरिकत्वासाठी पुन्हा अर्ज करू शकतात, मात्र आई सोनिया गांधींच्या तपशीलावर ते असा दावा करू शकणार नाही, कारण त्या भारतीय नागरिकच नाहीत, असा दावाही त्यांनी केला. सुब्रमण्यम स्वामी यांचे भाषण सुरू असताना स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे ( एसएफआय) कार्यकर्ते हातात सीएएला विरोध करणारे फलक घेऊन शांतपणे उभे होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा