मोदींना काँग्रेसने पाठवली ‘पे ऑन डिलिव्हरी’ संविधानाची प्रत; सोडवून घेतले तर रु.170 भूर्दंड!

0
238
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय संविधानाची प्रत पार्सलने पाठवली आहे. भारतीय संविधान आपल्याकडे लवकरच पोहोचत आहे. देशाचे विभाजन करण्याच्या कामातून जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल, तेव्हा ते जरूर वाचा, असा सल्लाही काँग्रेसने दिला आहे.

काँग्रेसने अमेझॉनवरून बुकिंग केलेले संविधानाचे हे पार्सल नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर पाठवले आहे. 170 रुपये किंमतीचे हे पार्सल पे ऑन डिलिव्हरी करण्यात आले आहे. त्यामुळे मोदींनी हे पार्सल सोडवून घेतले तर त्यांना 170 रुपयांचा भूर्दंड बसणार आहे. आणि ते सोडवून घेतले तर ‘देशभक्त’ पंतप्रधानांकडे भारतीय संविधानाच्या प्रतिसाठी 170 रुपयेही नाहीत, अशी टीका काँग्रेसकडून होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची माहिती देण्यात आली आहे.  अमेझॉनवरून संविधानाची प्रत पाठवल्याचा स्क्रीनशॉटही काँग्रेसने शेअर केला आहे. काँग्रेसने हे पार्सल पाठवल्यानंतर आणखी एक ट्विट करून भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. संविधानातील अनुच्छेद 14 नुसार देशातील सर्व नागरिकांना, त्यांची जात, पंथ, लिंग कोणतेही असले तरी कायद्यासमोर समानतेची हमी देण्यात आली आहे, हा धडा शिकण्यास भाजप अपयशी ठरली आहे. सरकारचा नागरिकत्व दुरूस्ती कायदा संविधानातील या अनुच्छेदाचे पूर्णतः उल्लंघन करणारा आहे, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा