‘फडणवीस सरकार गोस्वामींना का वाचवत होते?, तेव्हा भाजपला सीबीआय का आठवली नाही?’

0
56
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. सुशांतसिंह राजपूतची सुसाइड नोट नव्हती तरीही सर्वांची चौकशी होत आहे. परंतु अन्वय नाईकांनी अर्णब गोस्वामींना आत्महत्येसाठी दोषी ठरवूनही फडणवीस सरकारने साधी चौकशीही केली नाही. फडणवीस सरकार अर्णबला का वाचवत होते?,  तेव्हा भाजपला सीबीआयची आठवण का झाली नाही?,असा सवाल काँग्रेसने भाजपला केला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिस तपासात हलगर्जी करत असल्याचा आरोप करत भाजपने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. त्यासाठी रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणाचा हवाला दिला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी याबाबत ट्विट केले आहे. सुशांतसिंह राजपूतची सुसाईड नोट नव्हती तरीही सर्वांची चौकशी होत आहे. अन्वय नाईक यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामींचा नुसता उल्लेखच केला नव्हता तर दोषीही ठरवले होते. मग फडणवीस सरकारने अर्णबला साधं चौकशीलाही बोलावले नाही. अर्णबला का वाचवत होते? तेव्हा भाजपला सीबीआय आठवली नाही का?, असे सवाल सचिन सांवत यांनी केले आहेत.

अन्वय नाईक हे कॉन्कॉर्ड डिझाइन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक होते. ही कंपनी आर्किटेक्चर आणि इंटेरिअर डिझाइनचे काम करते. अर्णब गोस्वामी यांनी कॉन्कॉर्ड कंपनीकडून रिपब्लिकन टीव्हीच्या आर्किटेक्चर आणि इंटेरिअर डिझाइनचे काम करून घेतले. परंतु अर्णब यांनी ८३ लाख रुपये दिलेच नाहीत. त्यामुळे वडिल आणि आजीला आत्महत्या करावी लागली, असा आज्ञा नाईक यांचा आरोप आहे. अलिबाग पोलिसांनी या दृष्टिकोनातून तपासच केला नसल्याचाही आज्ञा नाईक यांचा आरोप आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा