राज्यात प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नेमणारः प्रदेशाध्यक्ष पटोले यांची घोषणा

0
18
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महिलांचा राजकारणातील सहभाग आणखी सक्रीय व्हावा म्हणून प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला भगिनींना मकर संक्रातीची भेट देत असल्याची घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

 काँग्रेस पक्षाने महिलांचा कायम सन्मान करत त्यांना समान संधी दिली आहे. प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल या महत्वाच्या पदांवर काँग्रेसने महिलांना संधी दिली आहे. महिलांना राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्याची काँग्रेसची परंपरा आहे. असे पटोले म्हणाले.

 महिलांना राजकीय प्रवाहात सामील करून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने हमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडमुकी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतीकारी निर्णयही काँग्रेस पक्षाच्या सरकारनेच घेतला होता. आताही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा क्रांतीकारी निर्णय काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी  यांनी घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरू केली हे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. लडकी हूं, लड सकती हूं अशी घोषणा देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने त्यांनी महत्वाचे पाऊल टाकले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्रालाही मोठी परंपरा लाभलेली आहे. महिला सक्षणमीकरणाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. स्थानिक पातळीवर महिलांना राजकारणात संधी देण्यात आली आहे. या निर्णय प्रक्रियेतील सहभाग आणखी वाढवा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पटोले म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा