नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे ७७ टक्के काम पूर्णत्वास, सप्टेंबरपर्यंत लागणार सर्व कामे मार्गी

0
149

मुंबई:  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे ७६.७३ टक्के काम डिसेंबर २०२१ अखेर पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे उर्वरित कामही वेळेत आणि दर्जेदार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) संजय बनसोडे यांनी दिले. येत्या सप्टेंबरपर्यंत या प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

बनसोडे यांनी आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, मुख्य अभियंता अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता जगताप व संबंधित अधिकारी हे उपस्थित होते.

हेही वाचाः ‘पत्नीच्या फायद्यासाठी सरकारी पदाचा वापर’: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हाय कोर्टाची नोटीस

नागपूर ते मुंबई या महामार्गादरम्यान भूपृष्ठ वाहतूक सुलभ होण्याच्या दृष्टीने ७०१ कि.मी. लांबीचा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येत आहे. सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८,८६,९०२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दि. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) हा महत्त्वाचा प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रकल्पास आवश्यक असलेला गौण खनिजांच्या उत्खननावर आकारणीपत्र असलेल्या स्वामित्वधन बसविण्यास सूट दिली आहे. बांधकाम पॅकेज १ ते १३ चे काम ३० महिन्याच्या कालावधीत व बांधकाम पॅकेज १४ ते १६ चे काम ३६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. यानुसार सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण करणे नियोजित आहे.

हेही वाचाः पुरूषोत्तम ‘अर्थ’शास्त्रः ना पदासाठी अर्ज, ना मुलाखत पत्र; तरीही देशमुखांची अधिव्याख्यातापदी नियुक्ती!

महामार्गास २२ डिसेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी वन विभागाची एकूण ५४६ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून वन विभागाला वन विकसित करण्यासाठी इतर ठिकाणी तेवढीच जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकूण ८० बांधकामे प्रस्तावित केली असून वन्यजीवांच्या वावरासाठी महत्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ध्वनीरोधकाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंतीची उंची वाढवण्यात आली आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

 महामार्गाच्या दुतर्फा ११ लक्ष ३१ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या हद्दीमध्ये झाडे लावणे, सुशोभिकरण करणे, सिंचन व्यवस्था करणे व संपूर्ण वृक्ष लागवडीची ५ वर्ष देखभाल आदी कामे करण्यात येणार आहेत. प्रकल्पामध्ये एकूण १६१ मेगा वॅट सौर उर्जा निर्मिती होणे अपेक्षित आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा