राज्यपाल कोश्यारींना विनोद पाटील म्हणाले ‘बदफैली’, धोतर फेडण्याचाही दिला इशारा

0
273
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?’  असे वक्तव्य करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महाराष्ट्रभरातून चौफेर टिकेची झोड उठली असतानाच मराठा आरक्षण याचिकाकर्ते आणि आर.आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी राज्यपाल कोश्यारींवर टीका करताना त्यांना थेट ‘बदफैली’ संबोधले आहे. त्यांनी राज्यपालांचे धोतर फेडण्याचाही इशारा दिला आहे. मराठी शब्दकोशात ‘बदफैली’ या शब्दाचा अर्थ व्यभिचारी, रंगेल, दुर्व्यसनी आणि पापाचरण करणारा असा देण्यात आला आहे.

राज्यपाल कोश्यारी हे रविवारी औरंगाबादेत आले होते. समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत ‘समर्थ के बिना शिवाजी कौन को पुछेगा?’ असे वादग्रस्त वक्तव्य करून समर्थ रामदास हे  शिवरायांचे गुरु होते, असे सांगण्याचा प्रयत्न केला. कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रभरातील शिवप्रेमींकडून टिकेची झोड उठली असून त्यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचाः Video: समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?, राज्यपाल कोश्यारींचे औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य

औरंगाबादेतील मराठा आरक्षण याचिकाकर्ते आणि आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनीही राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विनोद पाटील यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. ‘काल राज्याचे राज्यपाल यांनी नविन जावईशोध लावला. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये. आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. आपले वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते, असे विनोद पाटील यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी आवाहन करतो की तत्काळ या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही’, असा इशाराही विनोद पाटील यांनी या फेसबुक पोस्टमध्ये दिला आहे.

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी फेसबुकवर केलेली हीच ती पोस्ट. या पोस्टमध्ये त्यांनी राज्यपाल कोश्यारींना बदफैली असे संबोधले आहे.

 असा आहे मराठी शब्दकोशातील ‘बदफैली’ शब्दाचा अर्थः मराठी शब्दकोशात बदफैली या शब्दाचा अर्थ ‘छंदीफंदी, छचोर, पापाचरण करणारा, रंगेल, व्यभिचारी, कुकर्मी, दुर्वर्तनी, दुर्व्यसनी’ असा दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा