Video: समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?, राज्यपाल कोश्यारींचे औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य

1
385

औरंगाबादः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?’ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

औरंगाबादेतील तापडिया नाट्य मंदिरात रविवारी आयोजित समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना भगतसिंह कोश्यारी यांचा तोल सुटला आणि त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. यावेळी संत साहित्य शिक्षण व संशोधन प्रतिष्ठान औरंगाबाद, समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट औरंगाबाद, समर्थ वाग्देवता मंदिर धुळे, समर्थ मंदिर संस्थान जांब, गणेश सभा, एकनाथ संशोधन मंदिर या संयोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्य  बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा? समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा? (चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारेल?)  मी चंद्रगुप्त किंवा शिवाजीला लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते. तसेच आपल्या समाजात गुरुचे मोठे स्थान असते. तुमच्या कृपेनेचे मला राज्य मिळाले आहे, असे शिवाजीने समर्थाला सांगितले होते, असेही कोश्यारी म्हणाले.

आता या देशांची परंपरा आहे. जर गुरू असेल तर त्याला काय दिले पाहिजे?  गुरू आहेत तर त्याला गुरूदक्षिणाही दिली पाहिजे. मी जिंकलोय. राज्याची स्थापना झाली आहे आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरूदक्षिणा म्हणून या राज्याची चाबी तुम्हाला देतो, असे शिवाजींनी समर्थांना म्हटले. पण समर्थांनी ती चाबी घेतली नाही, असे कोश्यारी म्हणाले.

 कोश्यारी नेमके काय म्हणाले? पहा व्हिडीओ

कोश्यारींवर कोकाटेंची सडकून टीकाः कोश्यारी यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवाजी असा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोश्यारी हे महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून बेताल, निराधार आणि खोडसाळ वक्तव्य करण्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी महाराजांबद्दल अभ्यास करावा. रामदास हे कधीच महाराजांचे गुरू नव्हते. तरीही असे वक्तव्य करून कोश्यारींनी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे कोश्यारी यांनी तत्काळ माफी मागावी, असे कोकाटे यांनी म्हटले आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलनः पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यानी कोश्यारी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. कोश्यारींच्या वक्तव्याच्या निषेध म्हणून त्यांनी सोमवारी आंदोलनाची घोषणाही केली आहे.  अखंड  हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उद्या (सोमवारी) दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात येईल, असे जगताप यांनी जाहीर केले आहे.

एक प्रतिक्रिया

  1. मा . राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबददल औरंगाबाद येथे केलेले खोडसाळ आणी बेताल व निराधार वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलेले आहे. मनुवादी विचाराधारा जोपासणारी पिल्लावळ आजही अस्तित्वात असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांची व रामदास नावाच्या व्यक्तीची कधिही प्रत्यक्ष भेट झालेली नाही व छत्रपतीचे गुरु रामदास नव्हते हे इतिहासाने व मा . उच्च यायालयाने सिद्ध करून दाखविले आहे. छत्रपती महाराजाचे गुरु संत तुकाराम महाराज होते . रामदासाची विचारधारा व छत्रपतीची विचारधारा या मध्ये खूप तफावत आहे. लग्नांच्या मंडपातून पळून जाणारे रामदास . व सर्वंच किल्ले मनगटाच्या जोरावर जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज . यामध्ये तफावत आहे. म्हणून राज्यपाल यांनी केलेले वक्तव्य निराधार आहे.
    जाहीर माफी मागावी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा