शरद पवारांची थेट बाबासाहेबांच्या संविधानाशी तुलना, एमजीएम जर्नलिझमच्या प्राचार्या वादात!

2
1307

औरंगाबादः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना औरंगाबादच्या एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी शरद पवारांची थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशी तुलना केल्यामुळे वादाला तोंड फुटले असून डॉ.रेखा शेळके यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी आंबेडकरी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त देशभरातील विविध समाज घटकातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य माणसांकडूनही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. औरंगाबादच्या एमजीएमजी पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनीही पवारांना शुभेच्छा देणारी पोस्ट त्यांच्या फेसबुक टाइमलाइनवर केली.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

‘सोशल इंजिनिअरिंगचे व्हील तुम्ही…

गांधीजीची काठी तुम्ही

आंबेडकरांचे संविधान तुम्ही.

साहेब वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

असे प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले. या फेसबुक पोस्टसोबत त्यांनी त्या स्वतः शरद पवारांना पुस्तक भेट देत असल्याचा फोटोही शेअर केला. (पत्रकारिता विषयात पीएच.डी. मिळवलेल्या डॉ. शेळके यांच्या मूळ फेसबूक पोस्टमध्ये मराठी व्याकरणदृष्ट्या अनेक चुका आहेत. या पोस्टमध्ये इंजिनिअरिंग हा शब्दही नीटही लिहिलेला नाही. त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते.) मात्र डॉ. रेखा शेळके यांनी या पोस्टमध्ये शरद पवारांची थेट बाबासाहेबांच्या संविधानाशी केलेली तुलना आंबेडकरी जनतेला पटली नाही. त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी आक्षेप घेत तीव्र संताप व्यक्त केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशीच शरद पवारांची तुलना करून एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी बाबासाहेब आणि संविधानाचीही अनादर केला असून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंबेडकरवादी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांची हीच ती मूळ वादग्रस्त पोस्ट.

औरंगाबाद एमजीएम पत्रकारितेच्या प्राचार्यानी शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन प्रसंगी फेसबूक पोस्टमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची तुलना शरद पवारांशी केली. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आंबेडकराशी तुलना करून यांचं कर्तृत्व पुढच्या पिढीसमोरून मिटविण्याचा हा डाव तर नाही ना?आणि असे असेल तर पुरोगामीत्व मिरवणाऱ्या एमजीएम संस्थाचालक प्राचार्याची संकुचित वृत्तीची नक्की कीव यायला हवी या प्रकारामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या असून आम्ही तीव्र शब्दात अशा संकुचित प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो, असे भारत कोल्हे या नेटकऱ्याने म्हटले आहे.

जाहीर निषेध, जाहीर माफी मागावी मॅडम, अन्यथा संविधानाचा अनादर केला म्हणून रोषाला सामोरे जावे लागेल. कायदेशीर कार्यवाही तयार रहावे, असे जयश्री शिर्के यांनी म्हटले आहे.

निश्चितच शरद पवारांचे कर्तृत्व मोठे आहे. पण गांधीजींच्या काठीची आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची तुलना होऊ शकत नाही. तुम्ही डोके ठिकाणावर ठेवून पवार साहेबांना शुभेच्छा देणे अपेक्षित आहे, असे नागराज गायकवाड यांनी म्हटले आहे.

वाद होताच हटवली पोस्टः शरद पवारांची थेट बाबासाहेबांच्या संविधानाशी तुलना करण्याची आगळीक एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून झाल्यानंतर सोशल मीडियावर आंबेडकरी नेटकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी त्यांच्या टाइमलाइनवरून ही पोस्टच डिलिट करून टाकली आहे. ही पोस्ट डिलिट करण्याआधी त्यांनी त्यात सुधारणाही केल्या होत्या. ‘सोशल इंजिनिअरिंगचे व्हील तुम्ही…गांधीजींच्या विचारांनी चालणारे तुम्ही, बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारे तुम्ही…साहेब वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा’ अशी दुरूस्ती त्यांनी केली होती. तरीही नेटकऱ्यांच्या संताप थांबत नसल्याचे पाहून त्यांनी नंतर ही पोस्टच डिलिट करून टाकली. मात्र असंख्य नेटकऱ्यांनी या पोस्टचे स्क्रीन शॉट्स काढून ठेवले असून ते डॉ. रेखा शेळके यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा संविधानाचा अनादर केला म्हणून आंबेडकरी जनतेच्या रोषाला आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहावे, असे इशारे देत आहेत.

प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी नंतर मूळ फेसबुक पोस्टमध्ये दुरूस्त्या करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तरीही नेटकऱ्यांचा संताप थांबायचे नाव घेत नसल्याचे पाहून त्यांनी ही पोस्टच डिलिट करून टाकली.

2 प्रतिक्रिया

  1. जातीयवादी मानसिकतेचा गुलाम तु, लुटारूंच्या टोळीचे सरदार तुम्ही, भ्रष्टाचाराच्या वारूचे सारथी तुम्हीं, साहेब तुमच्या मरणाची वाट पाहतो आम्हीं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा