कोरोना लसीकरणः औरंगाबादेत बालरोगतज्ज्ञाला मिळाला पहिली लस घेण्याचा मान

0
242

औरंगाबादः देशभरात आजपासून कोरोना लसीकरणास सुरूवात झाली असून औरंगाबादेत बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र वैद्य यांना पहिली लस घेण्याचा मान मिळाला आहे.

राज्याचे उद्योगमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत आज औरंगाबादेत कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी खा. भागवत कराड, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर उपस्थित होते.

आम्ही नेहमीच सर्वांना लस देतो. मात्र कोरोना लसीविषयी लोकांच्या मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून आम्ही डॉक्टरांनी पहिल्यांदा लस टोचून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही लस टोचून घेतली आहे. औरंगाबादेत कोरोनाची पहिली लस घेण्याचा मान मला मिळाला आहे, असे डॉ. राजेंद्र वैद्य यांनी सांगितले.

लस घेतल्यानंतर पंधरा मिनिटे झाली तरी आपणाला कोणताही त्रास झालेला नाही. मात्र लस घेतली तरी सर्व नियमांचे पालन करा. मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग आणि हाताचे सॅनिटायजेशन करणे या गोष्टींची खबरदारी घ्या, असेही डॉ. वैद्य म्हणाले.
लस घेतल्यानंतर काय म्हणाले डॉ. राजेंद्र वैद्य ते पहाः

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा