राज्यातील १० मंत्री आणि २० हूनअधिक आमदारांना कोरोनाची बाधा, सरकारची चिंता वाढली

0
379

पुणेः राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढता दिसतो आहे. राज्यातील १० मंत्री आणि २० हून अधिक आमदारांना गेल्या काही दिवसांत कोरोनाची लागण झाली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आजही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयीस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाबाबत कालच राज्य सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे, असे पवार म्हणाले.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

लग्न समारंभ आणि अशा प्रकारचे अन्य समारंभ मोठ्या स्वरुपात व्हावेत, असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु कोरोनाचा नव्या स्वरुपातील विषाणूचा संसर्ग वेगाने होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. पाश्चात्य देशात प्रचंड प्रमाणात रूग्ण सापडत आहेत. आपण दुसऱ्या लाटेत मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवीताच्या काळजीपोटी राज्याने नियम कठोर केले आहेत. काही राज्यांनी रात्रीची जमावबंदी, टाळेबंदी केली आहे, असेही पवार म्हणाले.

हेही वाचाः वॉक-इन-इंटरिव्ह्यूसाठी अर्जच नसलेल्या दोघांची केली सहायक प्राध्यापकपदी निवड, एक जण कायम

 मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कोरोनाचा संसर्गा पसरणार नाही, याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत राहिल्यास आणखी कठोर निर्बंध लावावे लागतील, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.

या मंत्र्यांना झाली कोरोनाची लागणः कोरोनाची लागण झालेल्या मंत्र्यांमध्येवर्षा गायकवाड (शालेय शिक्षणमंत्री), बाळासाहेब थोरात (महसूल मंत्री),के.सी.पाडवी (आदिवासी विकासमंत्री),यशोमती थोरात (महिला व बालविकास मंत्री),प्राजक्त तनपुरे (नगरविकास राज्यमंत्री) यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा