लॉकडाऊनचा फटकाः दहा महिन्यांत लागले देशातील १० हजार ११३ कंपन्यांना टाळे

0
90
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना महामारीच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक कंपन्यांना टाळे ठोकावे लागले आहे. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दहा महिन्यांच्या काळात देशातील १० हजार ११३ कंपन्या बंद झाल्याची माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जाहीर केली आहे. कोणतीही दंडात्मक कारवाई न करता या कंपन्या स्वेच्छेने बंद झाल्या आहेत, असे एमसीएने म्हटले आहे. यातील सर्वाधिक बंद झालेल्या कंपन्या महाराष्ट्रातील आहेत.

कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत १० हजार ११३ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. कलम २४८(२) नुसार सरकारच्या वतीने कोणतीही दंडात्मक कारवाई न करता या कंपन्यांनी स्वतःहून आपले उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, ज्या कंपन्या व्यवसायातून बाहेर पडल्या आहेत, त्यांची माहिती मंत्रालयाकडे उपलब्ध नसते. २०२०-२१ या वर्षात कंपनी अधिनियमाच्या कलम २४८(२)नुसार एकूण १० हजार ११३ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. या कंपन्याविरोधात सरकारने कारवाई केल्यामुळे त्या बंद करण्यात आलेल्या नाहीत, असेही ठाकूर म्हणाले.

या बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये महाराष्ट्रातील १ हजार २७९ कंपन्यांचा समावेश आहे.  दिल्लीमध्ये सर्वाधिक २ हजार ३९४ कंपन्या बंद पडल्या आहेत. त्या खालोखाल तामिळनाडूमधील १ हजार ३२२, कर्नाटकमध्ये ८३६ कंपन्या बंद पडल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा