काळजी घ्या औरंगाबादकरः आज एकाच दिवसात आढळले तब्बल १ हजार २३ रुग्ण

0
343

औरंगाबाद:  औरंगाबादकरांच्या चिंतेत भर घालणारी बातमी आहे. जिल्ह्यात आज तब्बल १ हजार २३ कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून ही आकडेवारी आजपर्यंत सर्वोच्च आकडेवारी आहे. त्यातील तब्बल ७९३ रुग्ण हे औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. आज ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ४ हजार ९८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादेतील रूग्णवाढीचा हा वेग पाहता संसर्गाला अटकाव करण्यासाठी औरंगाबादची वाटचाल पूर्णतः लॉकडाऊनच्या दिशेने होत चालल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे आज महापालिका क्षेत्रातील ३६४ आणि ग्रामीण भागातील ५५ अशा ३६४ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत  ५१ हजार ३८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ हजार ७०१ वर पोहोचली असून आतापर्यंत १ हजार ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महानगरपालिका हद्दीत आज तब्बल ७९३ रुग्ण आढळले. त्यात मुकुंदवाडी १४, म्हाडा कॉलनी ११, बीड बायपास २१, जाधववाडी ११, बन्सीलाल नगर १२, , एसपीआय हॉस्टेल, हडको ११, पडेगांव १०, उल्कानगरी ९, रामनगर ९, कांचनवाडी ६, सिडको एन १२ मध्ये ८,  श्रेय नगर ८, प्रताप नगर ७, जयभवानी नगर ८, चिकलठाणा ८, बालाजी नगर ७, उस्मानपुरा ६, सिडको एन ४ मध्ये  ४, एन ५ ६, एन ६ मध्ये ११, एन ७ मध्ये ५, एन ८ मध्ये  ६, एन ९ मध्ये ५, एन ११ मध्ये ६,  नारळीबाग  १, घाटी ३, जिल्हा रुग्णालय १, उत्तरानगरी २, बजरंग चौक ४, गारखेडा ६, तापडिया नगर २, एन १ मध्ये ४, एन २ मध्ये ७, एन ३ मध्ये ३,  सेव्हन हिल २, टाऊन सेंटर २, विद्यानगर ३, राजेश नगर बीड बायपास १, त्रिमुर्ती चौक २, शिवाजीनगर ४, एन ११ मध्ये ४, बायजीपुरा २, सफलनगर १, मिलिट्री हॉस्पीटल १, मयुरपार्क ७,  श्रीकृष्ण नगर १, भाग्यनगर २, वसंत नगर १, सुदर्शन नगर १, सिंधी कॉलनी २,  व्यंकटेश नगर २, रामपुरी १, मेहेर नगर ३, सुराणा नगर १, एमजीएम परिसर ३, रोकडा हनुमान कॉलनी ४, एन १ १, नक्षत्रवाडी ३, क्रांती नगर २, सिल्क मिल कॉलनी २, एकनाथ नगर १, जयभवानी नगर १, रविंद्र नगर १, क्रांती चौक २,  दशमेश नगर १, स्नेह नगर १, भगतसिंग नगर २, ज्योती नगर ६, वंदन नगर १, समता नगर ३, सातारा परिसर ३, बागला नगर १, सिडको २, मिटमिटा ३, केसरी बाजार रोड १, वेदांत कॉलनी १, तिरुपती हॉटेल ३, समर्थ नगर ४,  देवगिरी कॉलनी १,  ईटखेडा ५, चाणक्यपुरी १, जय विष्णू भारती कॉलनी १, कुंभारवाडा १, गुलमंडी ३, एसटी कॉलनी २, गांधी  नगर २, टिव्ही सेंटर २, शिवशंकर कॉलनी २,  अरिहंत नगर १, उत्तम नगर १, न्यु हनुमान नगर ३, संजय नगर १, माजी सैनिक कॉलनी १, पुंडलिक नगर ३, माया नगर १, नारेगाव ६, न्याय नगर ३, आयोध्या नगर २, संभाजी कॉलनी १, जवाहर कॉलनी ४, वानखेडे नगर १, अंबिका नगर हर्सूल ३, प्रकाश नगर १, लघुवेतन कॉलनी २, विवेकानंद नगर २, मिलिंद नगर १, टाऊन सेंटर ३, संजय नगर बायजीपुरा २, ठाकरे  नगर ६, नैवेद्य हॉटेल १, प्रकाश नगर १, विष्णू नगर १, उच्च न्यायालय परिसर १, औरंगपुरा ५, राजाबाजार २ हिमायतबाग ४, काबरा नगर, गारखेडा २, सुधाकर नगर १, कासलीवाल मार्व्हल १, श्रीकृष्ण नगर १, कैलास नगर ४, दर्गा रोड २, जालान नगर १, पद्मपुरा ३, नंदनवन कॉलनी १,  गोल्डनसिटी १, दिशा संस्कृती ३, नारळीबाग २, पहाडसिंगपुरा २, दीपनगर २,  विश्रामबाग कॉलनी १, रेल्वे स्टेशन परिसर १, नागेश्वरवाडी २,विद्यानिकेतन कॉलनी २, मारीया हॉस्पीटल १, सादात नगर१, कासलीवाल तारांगण २, होनाजी नगर २, पोलिस कॉलनी २, सराफा कॉलनी १, दिशा नगरी १, पांढरी बाग २, समाधान कॉलनी १, सन्मित्र कॉलनी २, निराला बाजार १, भीम नगर १, जालना रोड २,खाराकुवा १, विजय नगर १, भारतमाता मंदिर १, रेणुका नगर १, चिश्तिया कॉलनी १, स्वामी समर्थ नगर १, गादीया विहार २, वेदांत नगर १, न्यु गणेश नगर १, भगत नगर ३, राजे संभाजी कॉलनी १, संकल्प नगर १, एकता नगर १, सुरेवाडी ३, सुराणा नगर २,टिळक नगर १, गजानन कॉलनी ५, आकाशवाणी १, भानुदास नगर १, शंभु नगर १,रविंद्र नगर १, राजनगर ३, खिवंसरा पार्क १, नाथ नगर १, विष्णू नगर १, ज्ञानेश्वर नगर १, सारंग सोसायटी १, स्टेशन रोड ३, शहानुरवाडी १, समता नगर १, झांबड इस्टेट १, पैठण गेट १, छावणी १, शक्तीनगर १, न्यु शांती निकेतन कॉलनी १, मयुरबन कॉलनी १, मकसुद कॉलनी १, अन्य २०४ रुग्णांचा समावेश आहे.                                                                 

ग्रामीण भागातही आज २३० रुग्ण आढळले आहेत. त्यात बजाज नगर ४३, सिडको महानगर ८, गंगापूर २, आडुळ १, वरुड काजी १, फुलंब्री २, रांजण गांव १, शेंद्रा एमआयडीसी ३, पिसादेवी १, मिसारवाडी ३, वाळुज ३, तिसगाव २, कुंभेफळ १, सावंगी १, वडगांव कोल्हाटी ४, पंढरपुर १, वरुड काझी १, सिल्लोड १,बिडकीन १, वाळूज १,   अन्य १४९ रुग्णांचा समावेश आहे.                                                                                 

 पाच कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटी रुग्णालयात गंगापूर येथील ३९ वर्षीय पुरूष, गारखेडा परिसरातील ५७ वर्षीय पुरूष, कन्नडच्या कंकवटी नगरमधील ६५ वर्षीय स्त्री, साईनगर एन-६ सिडकोमधील ५५ वर्षीय पुरूष आणि फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील ७१ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा