चिंता वाढलीः औरंगाबादेतील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्येत एकाच दिवसात तिप्पट वाढ

0
391
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद:  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच औरंगाबादेतील रूग्णसंख्येतही होणारी वाढ चिंता वाढवणारी आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज (मंगळवार) एकाच दिवसात १०३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. काल सोमवारी आढळून आलेल्या रूग्णसंख्येशी तुलना केली असता रुग्णसंख्येतील ही वाढ तिप्पट आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर औरंगाबादेतील कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांत ही रूग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज १०३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यात महापालिका हद्दीतील ८७ आणि ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

दुसरीकडे आज महापालिका हद्दीतील २० आणि ग्रामीण भागातील ४ अशा २४ जणांनी कोरोनावर मात केली. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १लाख ५० हजार ३९ झाली आहे. आजपर्यंत एकूण ३ हजार ६५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबादेत गेल्या गेल्या पाच दिवसात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रूग्णसंख्येचा विचार करता वाढत असलेली रूग्णसंख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी आहे. जिल्ह्यात ३० डिसेंबर रोजी १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. ३१ डिसेंबर रोजी १८, तर१ जानेवारीला २६ रूग्ण आढळून आले होते. २ जानेवारीला ही संख्या ३५ होती. ३ जानेवारीला त्यात किंचतशी वाढ होऊन ही संख्या ३७ वर पोहोचली होती. आज आकडा आज तीनपटीने वाढून आज १०३ वर पोहोचला आहे.

आज महापालिका हद्दीत ८७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यात  एन- तीन येथे ३, एन-दोन येथे १, एन-पाच येथे १, एन-४ येथे १, पडेगाव १, मुजीब कॉलनी १, एनआरएच वसतिगृह १, चेतना नगर १, टिळक नगर २, बन्सीलाल नगर १, हर्सूल १, वेदांत नगर १, कांचनवाडी १, देवाळली  २, दर्गा रोड १, बीड बायपास १, बायजीपुरा १, उत्तम नगर १, शिवाजी नगर १, टि.व्ही. सेंटर १, सिल्क मिल्क कॉलनी १, उस्मानपुरा १, म्हाडा कॉलनी १, वेदांत नगर २, अरिहंत नगर १, न्यू बालाजी नगर १, कांचनवाडी २, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी १,सुतगिरीणी चौक १, मिलिट्री हॉस्पीटल १, अन्य ५१ रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात आढळलेल्या १६ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये  औरंगाबाद २, फुलंब्री १, गंगापूर ३, कन्नड ७, वैजापूर २, पैठण १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात रूग्णसंख्येचा विस्फोट, दिवसभरात १८ हजार ४६६ रुग्णः दरम्यान, राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यासारखीच परिस्थिती आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल १८ हजार ४६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत आणि २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ओमीक्रॉनची बाधा झालेले ७५ रुग्णही सापडले आहेत. विशेष म्हणजे एकट्या मुंबईतच तब्बल १० हजार ८६० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा