औरंगाबाद जिल्ह्यात आज १ हजार ८१ नवे कोरोना रुग्ण, २७ जणांचा मृत्यू

0
259
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज, रविवारी १ हजार ८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या  १ लाख १८ हजार ५६९ झाली आहे तर आतापर्यंत कोरोनाने २ हजार ३७३ रुग्णांचे बळी घेतले आहेत.

आज औरंगाबाद महापालिका हद्दीतील ९५१ आणि ग्रामीण भागातील ७४२ अशा एकूण १ हजार ६९३ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख  २ हजार ५८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात १३ हजार ६१५ सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

आज महापालिका हद्दीत ४७० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिनाभरातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. आज आढळलेल्या रुग्णांत कांचनवाडी १६, चिकलठाणा १५, सिडको एन-६  येथे ९, जाधववाडी ९, बीड बायपास परिसर ९,  गारखेडा परिसर ८, न्यू हनूमान नगर ८, हडको एन-११ येथे ७, सिडको एन-५ येथे  ६, हर्सूल ५, म्हाडा कॉलनी ६, पुंडलिक नगर ६, गजानन कॉलनी ५,  घाटी परिसर २,  एन-१३ मध्ये २, सिडको एन-९ येथे ५, एन-१२ येथे १,  सिडको एन-२ येथे ६,  सिडको एन-८ येथे ३, सिडको एन-४ येथे ३, सिडको एन-३ येथे १, एन-७ मुकुंदवाडी २, शंभू नगर २, मयूरबन कॉलनी १,   म्हस्के पेट्रोल पंप १, चंद्रशेखर नगर १, राधास्वामी कॉलनी १, पिसादेवी २, न्याय नगर १, राजमाता जिजाऊ नगर १, छावणी १,  रेल्वे स्टेशन परिसर २, नंदनवन कॉलनी १, कासलीवाल मार्वल २,  विमानतळ परिसर १, जालान नगर १, नक्षत्रवाडी १, पदमपुरा ३, स्नेह नगर  १.

बन्सीलाल नगर ३, पडेगाव १, दिव्या मराठी  परिसर १, उस्मानपुरा १, देवानगरी १, चेलीपुरा १, खाराकुंआ १,  जवाहरनगर ३,  होनाजी नगर ३,  सावंगी १,   जटवाडा परिसर ३, अलंकार सोसायटी १, मिसारवाडी २, देवानगरी १, शिवेश्वर कॉलनी १,   देवळाई परिसर २, मित्र नगर १,  एमजीएम स्टाफ १,   छावणी २, पळशी ३,    जयभवानी नगर २,  देशमुख नगर १, म्हसोबा नगर १, नारेगाव ३, भावसिंगपुरा १, गणेश नगर ५, खडकेश्वर १, आदर्श कॉलनी १, विशाल नगर ३,  लक्ष्मी नगर २, शिवशंकर कॉलनी १, गजानन नगर २, सुंदर व्हॅली १, एस.टी कॉलनी ३.

चेतक घोडा १,  शिवाजी नगर ५, नाईक नगर २, जे.पी इंटरनॅशनल १, मधुबन कॉलनी २, छत्रपती नगर १, साई नगर ३,  वसंत विहार १,  देवळाई परिसर २,  राज नगर २, हायकोर्ट कॉलनी १, सहकार नगर १, शहागंज १,  रामनगर १,  शेंद्रा २, विश्रांती नगर ३,  सौजन्य नगर १, महेश नगर १, खोकडपुरा १,  संजय नगर १, बौध्दनगर १,श्रीराम नगर २, उत्तरानगरी १, सोहम मोटर्स परिसर १, व्दारकानगरी १,  वेदांत नगर १, प्रकाशनगर १, रशीदपुरा २, बायजीपुरा १,  अब्दीमंडी १, माळीवाडा १ आणि अन्य १६९ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ६११ रुग्ण आढळले. त्यात सिल्लोड ५,  फुलंब्री ३, गंगापूर ३, ए.एस क्लब, वाळूज ३,  पैठण १,जोगेश्वरी १, डोनगाव १, वैजापूर २, लाडगाव १,  चितेगाव २, पोखरी, पळशी १, बजाजनगर ११, खामगाव १, वडखा १, आडगाव१, अन्य ५६३ रुग्ण आहेत.

२७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूः औरंगाबाद जिल्ह्यातील २७ कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यापैकी २२ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच मिनी घाटीत २ आणि खासगी रुग्णालयात ३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील २० रुग्ण आहेत तर ७ रुग्ण शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा