औरंगाबादेत कालच्या पेक्षा आज थोडा दिलासा, थोडी चिंताः नवे रुग्ण घटले, पण मृत्यू वाढले!

0
174

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात  जिल्ह्यात शनिवारच्या तुलनेत आज, रविवारी नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात १ हजार २८० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल, शनिवारी १ हजार ९६४ रुग्ण आढळून आले होते. नवीन रुग्णवाढीबाबत औरंगाबादकरांना हा थोडासा दिलासा असला तरी दुसरीकडे चिंता वाढवणारी बातमीही आहे. आज २९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी २५ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

 दरम्यान, आज महापालिका हद्दीतील ९०० आणि ग्रामीण भागाती ५३५ अशा १ हजार ४३५ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ८१ हजार ३३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात १५ हजार ३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९८ हजार ६९२ कोरनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर १ हजार ९८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत आज ७२० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ही संख्या १ हजार ८७ होती. आज आढळलेल्या रुग्णांत सातारा परिसर ५३, शिवाजी नगर २०, गारखेडा १६, बीड बायपास १४, उल्का नगरी १३, सिडको एन-५ येथे ११, सिध्दार्थ आर्केड १०, सिडको एन-४ येथे ८, देवळाई ११, ठाकरे नगर ६, एस.टी.कॉलनी १, गजानन नगर ७, सिडको एन-२ येथे ७, सौजन्य नगर १, गादिया पार्क १, जाधववाडी ६,  एमजीएम हॉस्पीटल १, जवाहर कॉलनी ४, ब्राह्मण गल्ली २, समर्थ नगर २, तिरुपती नगर ३, सारा वैभव जटवाडा रोड १, संजय नगर ५, नारेगाव ३, टी.व्ही.सेंटर ४, वेदांत नगर १, दिशा संस्कृती पैठण रोड २, दशमेश नगर ३, नंदनवन कॉलनी २, शिल्प नगर १, श्रीनिकेतन कॉलनी २, ज्योती नगर ४, पैठण रोड ३, आदर्श नगर १, काका चौक १, सिल्कमिल कॉलनी २, पेठे नगर १, कैलाश नगर १, तापडिया नगर १, जालान नगर ८, मिलकॉर्नर १, पद्मपूरा ३, बन्सीलाल नगर २.

देवानगरी ५, कमलनयन बजाज हॉस्पीटल ३,  आनंद विहार पैठण रोड १, कांचनवाडी २, गादिया विहार ४, बालाजी नगर २, एन-३ येथे ४, बंदना नगर १, पुंडलिक नगर ५, हनुमान नगर ११, जय भवानी नगर २, चिकलठाणा ५, एमआयडीसी चिकलठाणा १, विश्रांती नगर ४, जिजामाता कॉलनी १, मदनी कॉलनी १, बजरंग चौक १, राजनगर १, रामनगर ६, मुकुंद नगर ४, सूतगिरणी चौक २, गणेश नगर १, तुळजाई नगर २, राजे चौक १, त्रिमूर्ती चौक १, विष्णू नगर ७, न्याय नगर १, सिडको एन-६ येथे ७, काल्डा कॉलनी १, भानुदास नगर ३, रोकडिया हनुमान कॉलनी २, हुसेन कॉलनी १, देवळाई चौक १, विठ्ठल नगर २, रेणूका नगर ३, विश्वभारती कॉलनी ३, अलंकार सोसायटी १, परिजात नगर १, महेश नगर २, शंभु नगर २, विजय चौक १, म्हाडा कॉलनी ५,  उद्योग अपार्टमेंट २, पहाडसिंगपूरा २, मुकुंदवाडी ६, शिवशंकर नगर १, नंदिग्राम कॉलनी १, गजानन कॉलनी १, हर्सूल २, बेगमपूरा २.

घाटी मेडिकल क्वार्टर १, एन-९ येथे ६, कॅनॉट प्लेस २, मयुर पार्क ८, एन-११ येथे ५, जटवाडा रोड ६, सनी सेंटर ३, सुरेवाडी १, एन-७ येथे ४, मिसारवाडी १,  एन-८ येथे ६, छत्रपती नगर  हर्सूल ४, प्रतापगड नगर १, आदित्य नगर हर्सूल १, सेवानगर हाऊसिंग सोसायटी १, समता नगर २, भावसिंगपुरा १, न्यू बायजीपुरा १, कासलीवाल तारांगण १, बंबाट नगर १, ईटखेडा २, एन-१ येथे २, शहाबाजार १, सावरकर नगर ३, डॉ.जैन हॉस्पीटल १, प्रताप नगर २, सिंधी कॉलनी १, नक्षत्रवाडी १, होनाजी नगर ४, वाल्मी १, घाटी परिसर १, श्रीकृष्ण नगर १, पेशवे नगर २, बंजारा कॉलनी १, देवळाई रोड २, ऑरेंज सिटी १, वृंदावन कॉलनी १, शंकर नगर १, नारळीबाग २, स्पंदन नगर २, तोरणागड नगर २, तापडिया पार्क १, जागृत हनुमान मंदिराजवळ १, विजय नगर १, खोकडपूरा १, चोबे हॉस्पीटल १.

भगतसिंग नगर २, सारासिध्दी १, एन-१२ येथे १, हडको १, नवजीवन कॉलनी २, आंबेडकर नगर १, अजब नगर १, हर्षनगर लेबर कॉलनी १, सिडको १, गजानन मंदिर १, क्रांती नगर १, टाऊन सेंटर १, महाजन कॉलनी १, न्यू हनुमान नगर १, पडेगाव ९, ओमसाई नगर १, राधास्वामी कॉलनी १, दिशा नगरी १, सुधाकर नगर १, बसैये नगर २, छत्रपती नगर ३, व्यंकटेश नगर १, कोटला कॉलनी १, खडकेश्वर १, न्यायमूर्ती नगर १, नागेश्वरवाडी १, भीमनगर १, अरिहंत नगर १, बुध्द नगर ४, एमएसईबी मिलकॉर्नर १, शहानूरवाडी ३, संभाजी नगर १, टिळक नगर १, उस्मानपूरा ३,  शहानूरमियॉ दर्गा १, देशमुख नगर १, एकनाथ नगर १, पैठण गेट १, युगंधर कॉलनी १, अन्य १८४ रुग्ण आहेत.

 ग्रामीण भागात आज ५६० कोरोनाबाधित रुग्ण आढळले. शनिवारी ही संख्या ८७७ होती. आज आढळलेल्या रुग्णांत सिडको वाळूज महानगर ५, बजाज नगर २, तिसगाव १, वाळूज ४, सिंचन नगर कन्नड १, हिवरा १, पाचोड १, चितेगाव १, लासूर स्टेशन २, पिशोर १, रांजणगाव ३, करमाड २, पिसादेवी ६, शेवगाव १, टोणगाव १, आडगाव सरक १, हर्सूल सावंगी २, शेंद्रा एमआयडीसी ३, दौलताबाद २, बोडखा ता.खुल्ताबाद १, सावता नगर वैजापूर १, लिहाखेडी सिल्लोड १, पेंढापूर गंगापूर १, सिल्लोड १, दौलताबाद १, फुलंब्री ३, वरुड खुल्ताबाद १, आडगाव १, खुल्ताबाद २, चिंचखेडा १, गदाना खुल्ताबाद १, औराळा कन्नड १, लाडसावंगी १, अन्य ५०३ रुग्ण आहेत.

 २९ रुग्णांचा मृत्यूः आज दिवसभरात जिल्ह्यातील २९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २१ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच मिनी घाटीत ३ रुग्णांचा तर खासगी रुग्णालयात ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांत १३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत तर १६ रुग्ण शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा