औरंगाबादचा आजचा कोरोना स्कोअर १,३८८ रुग्ण, २७ मृत्यू; ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत मोठी वाढ

0
102
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १ हजार ३८८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर २७ रुगणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत चालला असून आजही ग्रामीण भागात तब्बल ७५० कोरोनाबाधित रुग्ण आढळले. शहरात आढळलेल्या रुग्णांची संख्या ६३८ आहे.

गुरूवारी औरंगाबाद महापालिका हद्दीतील ८०० आणि ग्रामीण भागातील ४८१ अशा १ हजार २८१ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. याबरोबरच आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या  ८७ हजार ९९३ झाली आहे. आज आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यात आजपर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार ९७१ झाली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने २ हजार १०२ लोकांचे बळी घेतले आहेत. सध्या १५ हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत औरंगाबादच्या शहरी भागातच जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. मात्र आता हा संसर्ग ग्रामीण भागातही झपाट्याने हातपाय पसरू लागल्याचे दिसू लागले आहे. आज ग्रामीण भागात ७५० कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यापूर्वी बुधवारी ९४७ तर गुरूवारी ५६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते.

आज, गुरूवारी औरंगाबाद महापालिका हद्दीत ६३८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सातारा परिसर २४, बीड बायपास १७, उल्का नगरी १३, सिडको एन-२ येथे १२,  शिवाजी नगर १०, विमानतळ ५, औरंगाबाद ६, घाटी ७, गारखेडा परिसर ८, जय भवानी नगर २, मुकुंदवाडी ४, पडेगाव ६, पेठे नगर ३, एनएच हॉस्टेल १, गरमपाणी १, चिकलठाणा ८, छत्रपती नगर १, समर्थ नगर १, बन्सीलाल नगर ३, हर्सूल ६, देवानगरी २, सुराणा नगर १, भागीरथ नगर १,  सिडको एन-१ येथे ८,  म्हाडा कॉलनी उस्मानपूरा १, शितल नगर गादिया विहार १, आदर्श नगर १, शंभू नगर ३, समता नगर १, टिळक नगर १, कासलीवाल तांरागण पडेगाव १, ईटखेडा २, सहसंचाल कार्यालय १, भावसिंगपुरा ३, कांचनवाडी २, नंदनवन कॉलनी २, मोहटा देवी रेल्वेस्टेशन १, आर्मी कँम्प रेल्वेस्टेशन १, होनाजी नगर २, नारळीबाग १, गजानन नगर ७,  टी.व्ही.सेंटर ४, एन-६ येथे ४,  सिडको एन-३ येथे ३, पुंडलिक नगर ३, अर्णिका अपार्टमेंट उत्तरानगरी १, जिजामाता कॉलनी ३, एन-४ येथे ९, मोतीनगर १, नारेगाव ३, राजीव गांधी नगर १, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर १, महाजन कॉलनी १, मिलेनिअम पार्क १, म्हाडा कॉलनी एन-२ येथे १, ठाकरे नगर १, एस.टी.कॉलनी ४, विठ्ठल नगर २, कासलीवाल पूर्वा हाऊसिंग सोसायटी २, पटेल नगर नारेगाव १, हनुमान नगर ४, रामनगर २, उत्तरा नगरी ५, सनी सेंटर १, छावणी ४, देवळाई परिसर ७, शिवशंकर कॉलनी २, मोरेश्वर हाऊसिंग सोसायटी ३, विजय नगर २, तापडिया नगर १, नवनाथ नगर ३, भारत नगर ३, सिंधी कॉलनी १, स्वराज नगर १, कासलीवाल मार्व्हल १, गजानन कॉलनी १, हडको कॉर्नर १, गुरूदत्त नगर १, टाऊन सेंटर १, सूतगिरणी चौक १, पहाडे कॉर्नर ३, बालाजी नगर २, खिंवसरा पार्क १, नाईक नगर १, सिडको ४, कैलाश नगर १, सेंट्रल नाका १, संजय नगर ४, सेवन हिल १, साई सोसायटी २, लक्ष्मण चावडी मोंढा १, समर्थ चौक १, मयुर पार्क ९, एन-५ येथे ६, विशाल नगर २, विष्णू नगर ३, एमजीएम स्टाफ २,  सिडको एन-४ येथे १, मथुरा नगर १, एन-९ येथे ३, सिडको एन-७ येथे ४, मायानगर १, जवाहर कॉलनी ३, न्यू बायजीपुरा १, लोकमत कॉलनी १, एस.बी.कॉलनी २, गांधी नगर १, प्रणव प्लाझा १, उस्मानपुरा २, शहानूरवाडी १, नक्षत्रवाडी २, श्रेय नगर ३, ज्योती नगर २, म्हाडा कॉलनी १, न्यू उस्मानपूरा १, नागसेन नगर १,  नागेश्वरवाडी २, कृष्णा नगर १, सौजन्य नगर १, अदालत रोड १, उन्नती व्हेईकल प्रा.लि.सेवन हिल ५, न्यू श्रेय नगर १, एकविरा हॉस्पीटल १, भाग्य नगर १, बाबा पेट्रोलपंप २, न्यू विशाल नगर १, विवेकानंद नगर १, अंबिका नगर मुकुंदवाडी २, देशपांडे पुरम ३, बेंबडे हॉस्पीटल २, भानुदास नगर २, देशमुख नगर १, राजगुरू नगर १, विश्रांती नगर १, एमआयटी कँम्पस २, वाल्मी नाका १, बायजीपूरा १, ब्रिजवाडी १, एन-८ येथे २, एकता नगर जटवाडा रोड १, ईएसआयसी हॉस्पीटल १, एन-११ येथे ४, बजरंग चौक १, एम्स हॉस्पीटल १, पवन नगर १, बांबु मार्केट १, भडकल गेट १, बेगमपूरा २, जाधववाडी ६, घाटी हॉस्टेल १, काला दरवाजा ३, जटवाडा रोड २, नवजीवन कॉलनी १, हर्सूल टी पॉईट १, हरसिध्दी सोसायटी १, पावर हाऊस १, एसबीओए स्कूल १, कारागृह क्वार्टर १, एन-१२ येथे १, माऊली नगर १, एसआरपीएफ कँम्प १, गादिया विहार १, दर्गा चौक १, एन-१३ येथे १, हिमायत बाग १, बायजीपुरा १, बसैये नगर १, विजयश्री कॉलनी १, न्यू रोकडिया हनुमान कॉलनी १, बंबाट नगर २, औरंगपुरा १, आनंद नगर १, दीप नगर १, न्यू अन्सार कॉलनी १, कोहीनूर कॉलनी १, न्यू नंदनवन कॉलनी १, पिर बाजार १, ऑरेंज सिटी पैठणरोड १, परिजात नगर १, पद्मपुरा २, धावनी मोहल्ला २, आकाशवाणी १, अजब नगर १, बनेवाडी २, नाथपूरम ईटखेडा १, स्वानंद नगर २, इन्कम टॅक्स ऑफीस १, प्रताप नगर १, सुंदरवाडी १, सेंट्रल नाका क्वार्टर १, अन्य १८४ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ७५० रुग्ण आढळले. त्यात बजाज नगर ६, रांजणगाव २, सिडको वाळूज महानगर ३, वडगाव कोल्हाटी २, ए.एस.क्लब १,  गोळेगाव १, लासूर स्टेशन ५, जिकठाण १, डोणगाव कन्नड १, करमाड १, चिंचोली १, बिडकीन १, साजापूर १, नेवासा फाटा रेल्वेस्टेशन १, जोगेश्वरी १, कमलापूर १, चितेगाव पैठण १, तळेगाव ता.फुलंब्री १, पिशोर ता.कन्नड १, शेंद्रा एमआयडीसी २, झाल्टा १, इनायतपूर पैठण १, दौलताबाद २, बिनतोंड तांडा १, पिसादेवी ७, जयश्री कॉलनी १, जयहिंद नगरी १, मॅपेक्स कंपनी चिकलठाणा २, मुधलवाडी १, सिल्लोड ५, चिंचोली लिंबाजी ता.कन्नड १, सातारा खंडोबा १, गाढे जळगाव १, सावंगी १, हळदा ता.सिल्लोड १, आडगाव १, गंगापूर १, जायकवाडी पैठण १, कुंभेफळ १, गदाना खुल्ताबाद १, सोयगाव १, वैजापूर २, शेवगा करमाड १, धोंदलगाव वैजापूर १, मोडगाव सिल्लोड १, अन्य ६७८ रुग्ण आहेत.

२७ रुग्णांचा मृत्यूः औरंगाबाद जिल्ह्यातील २७ कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यापैकी २० मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात ३ आणि खासगी रुग्णालयात ४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांत शहरी भागातील ११ रुग्ण आणि ग्रामीण भागातील १६ रुग्ण आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा