औरंगाबाद जिल्ह्यात २४ तासांत १ हजार ३९४ नवे कोरोना रुग्ण, २१ जणांचा मृत्यू

0
42
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शनिवारी सायंकाळपर्यंत संपलेल्या २४ तासांत तब्बल १ हजार ३९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८६ हजार ९८१ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत १ हजार ७५८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे शनिवारी औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील १ हजार १५० आणि ग्रामीण भागातील ३६६ अशा १ हजार ५१६ जणांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत ६९ हजार ८८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १५ हजार ३४१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद महापालिका हद्दीत शनिवारी ९५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात सातारा परिसर २१, बीड बायपास २२, गारखेडा १७, शिवाजी नगर २०, उल्कानगरी १३, उस्मानपुरा ८, एन-९ येथे ११, कांचनवाडी १३, एन-६ येथे १२, एन-४ येथे १२, एन-८ येथे ११, एन-२ येथे १०, एन-५ येथे १०, औरंगाबाद ४, घाटी २, सादत नगर १, सिडको ६, पुंडलिक नगर ७, क्रांती चौक २, वेदांत नगर ३, ठाकरे नगर २, नागेश्वरवाडी ३, गादिया विहार ६, हिमायत बाग २, जालान नगर ४, दहिफळे हॉस्पीटल १, श्रेय नगर ५, बन्सीलाल नगर ९, साईसृष्टी पार्क पैठण रोड १, चौराहा गुलमंडी १.

 दत्त् नगर १, देवगिरी व्हॅली १, सुधाकर नगर रोड १, सहकार नगर १, पद्मपूरा १, चेतक घोड्याजवळ १, नंदनवन कॉलनी १, निळकंठ प्लाझा १, श्रीकृष्ण नगर ४, नक्षत्रवाडी २, वर्धमान रेसिडेंन्सी  १, भानुदास नगर २, अविष्कार कॉलनी २, टी.व्ही.सेंटर ५, सिग्मा हॉस्पीटल जवळ १, हर्सूल ४, खाराकुंआ ३, किराडपूरा १, कामगार चौक ३, एस.टी.कॉलनी २, कॅनॉट प्लेस १,  माया नगर २, प्रकाश नगर २, न्यू हनुमान नगर ६, मुकुंदवाडी ९, ज्योती नगर ५, चिकलठाणा ५, जय भवानी नगर ९, विश्रांती नगर १, उत्तरा नगर १, श्रीनिकेतन कॉलनी २, मिनाताई ठाकरे नगर १, एन-३ येथे १, म्हाडा कॉलनी ३, आकाशवाणी ३, पडेगाव ११.

आमिन चौक ३, समर्थ नगर ३, हनुमान नगर ४, गुरूकृपा हाऊसिंग सोसायटी १, कुंभारवाडा १, भाग्यनगर २, महेश नगर १, विष्णू नगर २, स्वामी विवेकानंद नगर ४, काल्डा कॉर्नर ३, एन-१ येथे ९, मित्र नगर २, कोटला कॉलनी १, बालाजी नगर १, खोकडपूरा १, नंदनवन कॉलनी २, विजय चौक २, भारत नगर २, विजय नगर ४, तिरुपती नगर १, गजानन मंदिर १, भगतसिंग नगर ३, प्रेरणा नगर १, हडको १, रामनगर १, राधास्वामी कॉलनी १, ताज हॉटेल १, यादव नगर १, अदित्य नगर १, जाधववाडी १, एन-११ येथे ३, सुभाषचंद्र बोस नगर १, मयुर पार्क ५, नवजीवन कॉलनी ३, नवनाथ नगर २, सारा वैभव १, राजगुरू नगर १, त्रिंबक नगर १.

अहिंसा नगर १, म्हस्के पेट्रोल पंप १, बंबाट नगर ४, मिसारवाडी १, छत्रपती नगर ५, हमालवाडा १, ऊर्जा नगर ३, ब्रिजवाडी एमआयडीसी १, संजय नगर ३, बाळकृष्ण नगर १, हॉटेल निशांत पार्क मागे १, ईटखेडा ४, संग्राम नगर २, विजयंत नगर १, रेणूकापुरम १, तापडिया नगर २, कासलीवाल मार्वल १, झेड गॅलक्सी जांबिदा मैदान १, बेगमपूरा ५, एन-७ येथे १२, एमआयडीसी सी-१९ येथे १, पैठण गेट २, एकता नगर १, सनी सेंटर ३, टेलिकॉम सोसायटी १, चाणक्यपूरी नगर २,  त्रिपाठी नगर २, काबरा नगर १, अलंकार कॉलनी २, देवानगरी ३, शंभु नगर ३, अरिहंत नगर ४, जवाहर नगर १, सुधाकर नगर २, शहानूरवाडी ४.

 व्यंकटेश कॉलनी १, झाकीर हुसेन सोसायटी १, एन-१० येथे १, जटवाडा रोड २, नक्षत्र पार्क ४, भावसिंगपूरा २, रेल्वेस्टेशन जवळ १, नेहरू नगर कटकटगेट १, चिंचबन कॉलनी १, मिटमिटा २, साऊथ सिडको १, औरंगपूरा १, चिश्तिया चौक १, होनाजी नगर १, महाराणा प्रताप सोसायटी १, न्याय नगर २, शिवशक्ती कॉलनी १, भवानी नगर जुना मोंढा १, त्रिमूर्ती चौक १, बाळकृष्ण नगर १, विनायक पार्क देवळाई रोड १, रेणूका नगर २, दिशा नगरी १, देशमुख नगर १, हायकोर्ट कॉलनी १, चाणक्यपूरी सोसायटी १, आयोध्या नगर १, हर्सूल टी पॉईट १.

रेल्वे स्टेशन १, पगारिया कॉलनी १, रामतारा हाऊसिंग सोसायटी १, युनूस कॉलनी १, शहागंज १, शिवशंकर कॉलनी १, लक्ष्मी कॉलनी १, भाजी बाजार छावणी २, अजबनगर १, रामलाल कॉलनी १, विश्रामबाग कॉलनी १, सारंग सोसायटी १, काला दरवाजा १, नारेगाव १, गजानन नगर १, एमजीएम हॉस्पीटल १, देवळाई २, न्यायमुर्ती नगर ६, चुनाभट्टी गांधी नगर १, सिविल हॉस्पीटल १, टिळक नगर १, जवाहर कॉलनी १, गरवारे स्टेडिअम मागे १, एमआयटी हॉस्पीटल १, अन्य ३८५ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात ४४२ रुग्ण आढळले. त्यात  बजाज नगर ३३, वडगाव कोल्हाटी ३, सिडको वाळूज महानगर ६, तिसगाव २, वाळूज १, कासोडा गंगापूर १, हिसोडा १, दुधड १, बनेवाडी १, कुंभेफळ १, शेंद्रा एमआयडीसी १, वाहेगाव गंगापूर १, सारा राज नगर १, श्रीनगर १, हर्सूल गाव १, पल्लाडी जळगाव १, टाकळी माळी  १, सिल्लोड १, पिसादेवी २, एमआयडीसी चिकलठाणा २, कन्नड १, पाचोड १, ढोरकीन बिडकीन १, सलामपूरा २, मोरे चौक २, स्वस्तीक नगर वाळूज १, वाळूज हॉस्पीटल ३, सावंगी हर्सूल २, गेवराई कुबेर १, रेलगाव सिल्लोड १, वरझडी १, बनकिन्होळा सिल्लोड २, रांजणगाव १, सारंगपूर १, वैजापूर १, जटवाडा हर्सूल १, पाचोड पोलीस स्टेशन १, घोरकुंद घाडेगाव १,  अन्य ३५६ रुग्ण आहेत.

२१ रुग्णांचा मृत्यूः शनिवारी घाटी रुग्णालयात ११ तर खासगी रुग्णात १० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश मृत्यू हे ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत १ हजार ७५८ कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा