औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळले १ हजार ४०६ नवीन कोरोना रुग्ण, २० रुग्णांचा मृत्यू

0
227
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोना संसर्गाचा फैलाव आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. आज, सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ४०६ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात औरंगाबाद महापालिका हद्दीतील  १ हजार १९ आणि ग्रामीण भागातील ३८७ कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज तब्बल २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे जिल्ह्यात आज ६३४ जणांचा सुटी देण्यात आली. त्यात महापालिका हद्दीतील ५०० आणि ग्रामीण भागातील १३६ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ५०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६८ हजार ७६० कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर १ हजार ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ११ हजार ८१९ सक्रीय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महापालिका हद्दीत आढळलेल्या  १ हजार १९ कोरोना बाधित रुग्णांमध्ये ‍ सिडको एन-२ मध्ये ३२, गारखेडा १८,  मुकुंदवाडी ११, जय भवानी नगर १२, सिडको एन-७  मध्ये  १४, सातारा परिसर २०, हर्सूल १०, सिडको एन-६ मध्ये ११, औरंगाबाद १९, घाटी रुग्णालय २, सिडको ४, व्यंकटेश नगर २, गुलमंडी १, नंदनवन कॉलनी १, पडेगाव ६, टी. व्ही. सेंटर १, न्यु उस्मानपूरा १, चिकलठाणा ५, एन-४ १२, विश्रांती नगर १, एन-१ ४, बीड बायपास १०, हनुमान नगर २, शिवनेरी कॉलनी १, पुंडलिक नगर ६, विजयनगर २, एकविरा हॉस्पीटल १, परिजात नगर १, एन-३ ८, बसैये नगर २,  एन-९ ८, दर्गा रोड ५,  सिडको एन-८  मध्ये ११, शिवकृपा निवास दत्त मंदिराजवळ ३, उत्तरा नगरी १, शिवाजी नगर ६, हर्सूल टी पाँईट २, म्हाडा कॉलनी मुर्जिजापूर १, मयुर पार्क ५, कामगार चौक १, हडको ३.

सिल्कमिल कॉलनी २, विनस सोसायटी १, भानुदास नगर १, सौजन्य नगर १, बालाजी नगर २, सिविल हॉस्पीटल १, हिंदुस्थान आवास १, हरिप्रसाद नगर १, देवळाई ३, ज्योती नगर ५, देवानगरी ५, बँक कॉलनी १, नारेगाव ३, जवाहर कॉलनी ३, अलंकार सोसायटी १, भारत नगर १, तापडिया नगर २, सुहास सोसायटी ५, उल्कानगरी ९, शिवशंकर कॉलनी ३, गजानन नगर ३, प्राईड इनिग्मा २, साई नगर ४, न्यू विशाल नगर १, रेणूका नगर ५,  विश्वभारती कॉलनी १, गजानन कॉलनी १, विष्णू नगर १, मित्र नगर ३, गणेश अपार्टमेंट १, गुरूदत्त नगर १, मुकुंद नगर १, राजा बाजार १, गणेश नगर १, सिंधी कॉलनी ४, अजब कॉलनी १, विशाल नगर १, एन-५ २, रामनगर १, कॅनॉट प्लेस १, खडकेश्वर ३, वानखेडे नगर १, जाधववाडी ३, नवजीवन कॉलनी १, सुदर्शन नगर ४, ठाकरे नगर ४.

  मारुती नगर २, चिश्तिया चौक १, होनाजी नगर ३, पिसादेवी रोड १, हरसिध्दी माता नगर १, आंबेडकर नगर १, ब्रिजवाडी १, चेलीपूरा १, अक्षय पार्क १, सुवर्ण नगर २, आकाशवाणी १, न्यू एसटी कॉलनी १, पुष्पनगरी २, बंजारा कॉलनी १, पिंप्री १, गजानन मंदिर १, न्यू हनुमान नगर १, शहानूरमियॉ दर्गा १, खोकडपूरा २, पैठण गेट २, साई स्पोर्टस १, रोझाबाग १, पहाडसिंगपूरा १, रशिदपूरा १, बन्सीलाल नगर १०, छत्रपती नगर १, छावणी २, सुराणा नगर २, कांचनवाडी २, एकनाथ नगर २, समर्थ नगर ४, ईटखेडा ४, जाधवमंडी राजा बाजार १, पद्मपूरा ६, नागेश्वरवाडी २, आनंद विहार १, कासलीवाल तारांगण २, जालान नगर ३, पिरबाजार ४, प्रताप नगर ३,  छत्रपती नगर १.

सुराण नगर १, समाधान कॉलनी ३, उस्मानपूरा ३, बेगमपुरा १, कासलीवाल मार्बल २, अलोक नगर १, सहकार नगर १, दशमेश नगर १, न्यू श्रेय नगर १,   कार्तिक नगर १, पैठण रोड २, मकाई गेट १, मुलांचे वसतिगृह १, न्याय नगर १, चेतना नगर १, श्रेय नगर २, एन-११ १, एमजीएम परिसर १, नालंदा नगर १, गुरूप्रसाद नगर २, दर्जी बाजार १, सोधी हॉस्पीटल उस्मानपुरा १, आकशवाणी १, मनजीत नगर २, कैलास नगर ३, एसबीएच कॉलनी जालना रोड १, क्रांती चौक २, स्नेह नगर २, जहागिरदार कॉलनी १, अन्‍ ५९२ रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात आज ३८७ कोरोनाबाधित आढळले. त्यात बजाजनगर ४७, सिडको महानगर १५, गंगापूर १०, अंतरवाली खांडी १, बिडकीन १, सिडको वाळूज १, सताळ पिंप्री १, शेंद्रा एमआयडीसी ४, अब्दी मंडी ३, आन्वा १, कन्नड १, मिटमिटा ४, बजरंग कॉलनी १, पिसादेवी २, पंढरपूर २, तिसगाव ५, रांजणगाव १२ विजय नगर १, दौलताबाद २, खुल्ताबाद १, वडगाव कोल्हाटी ५, वळदगाव १, इटावा १, पैनगंगा हाऊसिंग सोसायटी ३, पैठण १, वाळूज १, गोरख वाघ चौक १, प्रताप चौक  १, साई प्रसाद पार्क १, सारा वृंदावन सिडको १, फुलंब्री १, राजेवाडी लाडसावंगी १, मोढा १, आडगाव १,  अन्य २५७ रुग्ण आहेत.

 २० रुग्णांचा मृत्यूः दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल २० कोरोना बाधित रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झाला. त्यातील १४ रुग्णांचे मृत्यू घाटी रुग्णालयात झाले तर उर्वरित ६ मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू होण्याची ही जिल्ह्यातील सर्वोच्च आकडेवारी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा