औरंगाबाद जिल्ह्यात आज १ हजार ४०७ नवे कोरोना रुग्ण, २९ रुग्णांचा मृत्यू

0
66

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वेग  अद्याप कायम असून बुधवारी दिवसभरात १ हजार ४०७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आज आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णात महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १४ हजार ८९७ सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९२ हजार ६७३ वर पोहोचली आहे.

आज महापालिका हद्दीतील १ हजार २०० आणि ग्रामीण भागातील ३९८ अशा एकूण १ हजार ५९८ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ७५ हजार ९०३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद महापालिका हद्दीत आज ९९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात सातारा परिसर १४, गारखेडा परिसर १९, बीड बायपास १८, सिडको एन-४ येथे १४, जय भवानी नगर १३,शिवाजी नगर १०, सिडको एन-८ येथे ९, , सिडको एन-७ येथे ८, पद्मपुरा ७, कांचनवाडी ६, औरंगाबाद ९, एन-१ येथे ६, विद्यापीठ गेट १, एन-२ येथे १५, उल्का नगरी ६, भावसिंगपूरा ५, बालाजी नगर ४, उत्तरा नगरी ४, बजरंग चौक २,  एन-३ येथे ४, एन-९ येथे ७, गुलमंडी १, खोकडपूरा १,  मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन १, टिळक पथ २, एन-१२ येथे २, जाधववाडी ५, विजय नगर २, एस.टी.कॉलनी ३, सुराणा नगर ६, गजानन नगर ७, विशाल नगर २, रामकृष्ण नगर १, मोती तारांगण १, हिंदूराष्ट्र चौक १, श्रीराम नगर १, गणेश नगर १, रहेमानिया कॉलनी १, विष्णू नगर ३, हुसेन कॉलनी २, शास्त्री नगर २, गजानन कॉलनी १, हनुमान नगर ४, शिवशंकर कॉलनी २, ज्ञानेश्वर नगर १, सुतगिरणी  चौक १, देशमुख नगर १, उत्तम नगर २.

एमआयडीसी औरगाबाद २,  सहकार नगर १, जय जिजाऊ नगर २, साहस सोसायटी १, पुंडलिक नगर ५, यशवंत नगर १, भोईवाडा १, शहा बाजार १ हर्सूल ४, सनी सेंटर १, एन-६ येथे ४, मिसारवाडी १, एन-११ येथे ५, सुरेवाडी १, एन-५ येथे ५, विजयश्री कॉलनी १, एकता नगर २, टाऊन सेंटर २, नारेगाव ३, टी. व्ही.सेंटर ६, पवन नगर हडको ३, म्हसोबा नगर १,  सिटी चौक पोलीस स्टेशन १, लेबर कॉलनी १, म्युनसिपल कॉलनी १, महाजन कॉलनी १, चेलीपूरा १, गांधी नगर १, ज्योती नगर २, उस्मानपूरा ६, कडा कॉलनी १, न्यू बायजीपुरा २, कैसर कॉलनी १, विश्वेश्वर कॉलनी १, संकल्प नगर १, सारा वैभव २,  गोकुळ नगर १, भगतसिंग नगर १, मयुर पार्क १, जुनी मुकुंदवाडी १, अशोक नगर १, न्यू हनुमान नगर १, ठाकरे नगर ३, हिमलया हाऊसिंग सोसायटी १, विठ्ठल नगर १, राम नगर ३,  चिकलठाणा ३, मुकुंदवाडी ४, विमानतळ १,  सिडको २, मिलेनिअम पार्क १, हिंदू राष्ट्र कॉलनी १, विजेयंता नगर १.

शिवनेरी कॉलनी १, म्हाडा कॉलनी १, राजीव गांधी नगर ४, मिलकॉर्नर १, प्रकाश नगर १, रमा नगर १, मीरा नगर १, ईटखेडा ३, श्रेय नगर ३, दिशा संस्कृती २, नक्षत्र पार्क १,  हिंदुस्थान आवास १, यश मुथीयान १, प्राईड फिरीक्स १, महेर नगर २, न्यू विशाल नगर १, विजय चौक १, स्वप्न नगरी १, छत्रपती नगर ३, देवा नगरी ३, जालान नगर २, पेशवे नगर २, सुधाकर नगर ३, व्हिजन सिटी १, नाईक नगर ४, आलोक नगर ३, शहानूरवाडी २, अल्पाईन हॉस्पीटल २, काबरा नगर १, आभूषण पार्क २, दिशा नगरी ३, जान्हवी रेसिडेंन्सी अय्यपा मंदिर २, हायकोर्ट कॉलनी १, कासलीवाल मार्वल २, मल्हार नगर १, विद्यानिकेतन कॉलनी २, समता नगर १, केसरी बाजार २, कोटला कॉलनी १, विकास नगर १, समर्थ नगर ३, पगारिया निवास १, पडेगाव ४, इंदिरा नगर १, नंदनवन कॉलनी २, सराफा रोड १, पानदरिबा रोड १, घाटी रुग्णालय १, फाजलपूरा १, एनआरएच १,  तिरुपती नगर २, बन्सीलाल नगर १, छावणी ३.

औरंगपुरा १, टी पॉईंट १, रेल्वे क्वार्टर १, देवळाई ४, त्रिमूर्ती चौक २, स्वानंद नगर १, विश्वभारती कॉलनी १, डी.वाय.पाटील लॉन्स १, तिरुपती विहार १, भानुदास नगर १, शिवशक्ती कॉलनी १, रेल्वे स्टेशन १, वेदांत नगर १, टिळक नगर २, सुतगिरणी चौक ३, न्यू पहाडसिंगपुरा १, जयसिंगपूरा १, मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर स्टाफ १, प्रतापनगर १, कोकणवाडी १, काका चौक २, मधुमालती नगर २, रेणूका अपार्टमेंट १, सूर्यादिप नगर १, सिटी हॉस्पीटल १, दशमेश नगर १, बेगमपुरा १, नागेश्वरवाडी १, खडकेश्वर ३, पैठण गेट १, अजब नगर २, अमृत साई प्लाझा १, भवानी नगर १, एअरपोर्ट कॉलनी १, नाथनगर १, गादिया विहार १,  अन्य ५११  रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ४०८ रुग्ण  आढळून आले आहेत.  त्यात  बजाज नगर १५, सिडको वाळूज महानगर ६, वाळूज १, वडगाव कोल्हाटी ५, सालुखेडा खुल्ताबाद १, साऊथ सिटी ४, वाळूज ३, दौलताबाद १, बाळापूर फाटा १, पिसादेवी २, हर्सूल सावंगी १, पेंढापूर गंगापूर १, आपतगाव १, एकोड १, गंगापूर ३, पैठण २, लासूर स्टेशन २, आडगाव खुर्द २, खोजेवाडी १, कुंभेफळ २, वाडेगाव १, रांजणगाव ४, सारा व्यंकटेश २,  सप्तश्रृंगी हाऊसिंग सोसायटी १, तिसगाव ४, ए.एस.क्लब वाळूज १, शेंद्रा एमआयडीसी १, बनेवाडी १, मोरे चौक वाळूज १,  अन्य  ३३७ रुग्ण आहेत.

२९ रुग्णांचा मृत्यूः बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील २९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १७ रुग्णांचे मृत्यू घाटी रूग्णालयात, २ रुग्णांचे मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात तर १० रुग्णांचे मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. आज मृत्युमुखी पडलेल्या २९ रुग्णांपैकी १३ रुग्ण हे ग्रामीण भागातील तर १६ रुग्ण हे शहरी भागातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ हजार ८७३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा