नांदेड जिल्ह्यात १,४५० नवे कोरोनाबाधित रुग्ण; तीन दिवसांत २६ मृत्यू, १८९ रुग्ण अतिगंभीर

0
47

नांदेड:  नांदेड जिल्ह्यात गुरूवारी १ हजार ४५० अहवाल कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितींची संख्या ५२ हजार ३४२ एवढी झाली असून यातील ४० हजार ११८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात १० हजार ९७९ रुग्ण उपचार घेत असून १८९ कोरोना बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

४ ते ७ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ९९६ एवढी झाली आहे. दरम्यान, गुरूवारी १ हजार २२७ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ६, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ८२२, कंधार तालुक्याअंतर्गत ६, किनवट कोविड रुग्णालय १९, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत ३, अर्धापूर तालुक्याअंतर्गत २३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २०, उमरी तालुक्यातंर्गत ३४, नायगाव तालुक्याअंतर्गत ११, मुखेड कोविड रुग्णालय ४५, देगलूर तालुक्याअंतर्गत ३०, खाजगी रुग्णालय ११४, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ४, हदगाव कोविड रुग्णालय १९, माहूर तालुक्याअंतर्गत ८, बिलोली तालुक्याअंतर्गत ३२, लोहा तालुक्याअंतर्गत ३१ अशा एकूण १ हजार २२७ बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.६४ टक्के आहे.

गुरूवारी आढळलेल्या रुग्णांत आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २८९, बिलोली ६, हिमायतनगर ४५, मुदखेड ८, परभणी ४, नांदेड ग्रामीण ३१, देगलूर ४३, कंधार १, मुखेड ५०, यवतमाळ २, अर्धापूर १६, धर्माबाद १६, किनवट १७, नायगाव ३९, हिंगोली ७, भोकर १०, हदगाव ५१, लोहा २६, उमरी २४, बिदर १ असे  एकूण ६८६ बाधित आढळले.

ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३२३, नांदेड ग्रामीण २८, अर्धापूर २९, भोकर २८, बिलोली ३१, देगूलर १९, धर्माबाद ११, हदगाव १८, हिमायतनगर ३, कंधार ११, किनवट ८३ , लोहा ४२, माहूर १५, मुदखेड २७, मुखेड १२, नायगाव ३७, उमरी ३४, परभणी ८, यवतमाळ ९, हिंगाली २, औरंगाबाद १, पुणे १ असे एकूण ७६४ व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत. जिल्ह्यात १० हजार ९७९ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा