औरंगाबाद शहरात ६१२ तर ग्रामीण भागात ८४६ नवे कोरोना रुग्ण; २४ रुग्णांचा मृत्यू

0
229

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांची संख्या काहीअंशी कमी होत चालली असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत मात्र वाढ होत चालली आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ४५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १५ हजार २२ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे आज महानगरपालिका हद्दीतील ७४० आणि ग्रामीण भागातील ६९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९७ हजार १९८ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत २ हजार २७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १४ हजार ४९५ वर पोहोचली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद महापालिका हद्दीत आज ६१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात सातारा परिसर २४, गारखेडा परिसर १०, हर्सूल १०, गजानन नगर १०, बीड बायपास ९, चिकलठाणा ९,शिवाजी नगर ८, जय भवानी नगर ८, सिडको एन-७ येथे ८, सिडको एन-६ येथे ७, मयूर पार्क ७, सिडको एन-४ येथे ७, सिडको एन-१ येथे ६, शिवशंकर कॉलनी ८, नारेगाव ८, औरंगाबाद ४, घाटी ४, म्हाडा बाबा पेट्रोल पंप १, बन्सीलाल नगर १, नारळीबाग १, न्यू विशाल नगर १, पडेगाव २, भाग्य नगर २, नंदनवन कॉलनी २, एन-११ येथे १, म्हाडा कॉलनी १, पुंडलिक नगर २, विजयंत नगर २, जवाहर कॉलनी २, विश्रांती नगर ३, रामनगर ४, मोती नगर २, एकविरा हॉस्पीटल १, गजानन कॉलनी ४, हनुमान नगर २, मुकुंदवाडी ४, ठाकरे नगर ४, विठ्ठल नगर १, एन-३ येथे ४, गणेश नगर २, महाजन कॉलनी १, बालजी नगर २, विवेकानंद नगर १, चौरंगी हॉटेल १, विशाल नगर २, नाईक नगर ३, आदर्श कॉलनी २, अरिहंत नगर १.

अलंकार सोसायटी १, विजय नगर २, राज नगर २, नाथ नगर ३, शहानूरवाडी २, बालाजी नगर १, मेहेर नगर १, गादिया विहार ३, जवाहर कॉलनी १, मल्हार चौक १, सूतगिरणी चौक २, भारत नगर १, छावणी २, उल्का नगरी ४, बाळकृष्ण नगर १, चाणक्यपुरी १, शहानूरमियॉ दर्गा १, उस्मानपूरा २, आलोक नगर २, कासलीवाल तारांगण २, कासलीवाल रेसिडेंन्सी १, मित्र नगर १, नवजीवलन कॉलनी १, भोईवाडा १, उत्तरा नगरी ३, म्हाडा कॉलनी २, एन-२ येथे ४, सिडको एन-१२ येथे ४, द्वारकादास नगर १, गुरूसाक्षी हाऊसिंग सोसायटी १, कासलीवाल मार्वल १, अयप्पा मंदिराजवळ १, जालान नगर २, महेश नगर १, सिडको २, हायकोर्ट कॉलनी १, माऊली नगर १, ऑरेंज सिटी १, ईटखेडा ३, नक्षत्रवाडी १, कांचनवाडी ४, सिल्कमिल कॉलनी १, तापडिया नगर १, नवजीवन कॉलनी २, ब्रिजवाडी १, एन-५ येथे १, अशोक नगर १, पिसादेवी रोड २, ऑडिटर सोसायटी १, देवळाई चौक १, जाधववाडी ३.

राधाकृष्ण कॉलनी १, सारा परिवर्तन १, प्रतापगड नगर १, जटवाडा रोड २, सुभाष नगर २, भगतसिंग नगर १, गोकुळ नगर १, भारतमाता नगर १, एन-९ येथे १, नवनाथ नगर १, रोझा बाग १,  जाधवमंडी १, एमआयडीसी कॉलनी १, एमआयडीसी चिकलठाणा १, समर्थ नगर ५, बसैये नगर १, न्यु हनुमान नगर १, आकाशवाणी १, होनाजी नगर १, मिलेनिअम पार्क चिकलठाणा १, इंदिरानगर १, शिवशक्ती कॉलनी १, एमजीएम हॉस्पीटल १, प्रगती कॉलनी १, देशमुख नगर उस्मानपूरा १, प्रभाश्री घरवाल रेसिडेंन्सी १, कोकणवाडी १, विकास नगर १, काल्डा कॉर्नर न्यु श्रेय नगर १, मिटमिटा ४, पहाडसिंगपूरा १, भारती कॉलनी १, ज्योती नगर १, प्रकाश नगर २, हरिश्चंद्र नगर २, पद्मपूरा १, मेल्ट्रॉन हॉस्पीटल १, सुंदरवाडी १, प्रतापनगर १, देव्हाडा नगर १, भवानी नगर सिडको १, अन्य २६८ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात ८४६ नवे रुग्ण आढळले. त्यात बजाज नगर १, वाळूज ४, सिडको वाळूज महानगर २, तिसगाव १, पुरी ता.गंगापूर १, रांजणगाव ४, चिते पिंपळगाव २, जटवाडा १, मेघा इंजिनिअरिंग पळशी २, आडगाव विखे १, मांडना ता.सिल्लोड १, बाभुळगाव १, वरझडी ता.गंगापूर १, लोणवाडी ता.सिल्लोड १, सिल्लोड २, नायगाव खांडेवाडी १, पिसादेवी १, सावंगी ४, म्हसला ता.सिल्लोड १, बोधेगाव ता.फुलंब्री १, लायेगाव १, यशवंत नगर पैठण १, प्रवरा संगम १, वरुड काझी १, वाहेगाव १, फुलंब्री १, बीडगाव ता.सिल्लोड १ आणि ८०६ रुग्ण आहेत.

२४ रुग्णांचा मृत्यूः जिल्ह्यातील २४ कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला. त्यापैकी २४ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत. १मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच मिनी घाटीत तर ३ मृत्यू खासगी रुग्णालयांत झाले आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ११ मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत. तर १३ मृत्यू हे शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा