औरंगाबादेत आज आढळले १ हजार २५१ कोरोना बाधित रुग्ण, ५ जणांचा मृत्यू; आकडेवारीत घोळ

0
206

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यात  आज शुक्रवारी दिवसभरात १ हजार २५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९ हजार ३५७ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या इंटिग्रेटेड डिसीज सर्विलन्स प्रोग्रामने (आयडीएसपी) आज शुक्रवारी जारी केलेल्या मीडिया बुलेटिननुसार आज औरंगाबादेतील सक्रीय रुग्णांची संख्या तब्बल ११ हजार ५२४ आहे. तर मृतांची संख्या १४ आहे. काल गुरूवारी औरंगाबादेतील सक्रीय रुग्णांची संख्या ८ हजार ५७० एवढी होती. आयडीएसपीने दिलेली आजची सक्रीय रुग्णांची संख्या पाहता आज औरंगाबादेत नव्याने आढळेल्या कोरोना रुग्णांची संख्या तब्बल २ हजार ९५४ वर जाते.

दरम्यान, शुक्रवारी महापालिका हद्दीतील ३८० आणि ग्रामीण भागातील ७९ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ५३ हजार ४५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत १ हजार ३८८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

खाली नमूद करण्यात आलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्हा माहिती कार्यालयाने जारी केलेल्या बातमीपत्रानुसार आहे.

औरंगाबादेत दिवसभरात १ हजार ६२ रुग्ण आढळले. त्यात बीड बायपास १७, सिडको  एन-२ मध्ये  १७, सिडको एन-६ १७, गारखेडा परिसर १८, पुंडलिक नगर १४,  जय भवानी नगर १०, सिडको एन-९ मध्ये ९, उल्का नगरी १०, सिडको एन-५ मध्ये १३, समर्थ नगर ८, देवानगरी ६, मयुर पार्क ९, एन-४ मध्ये ६, पीईएस कॉलेज ७, ज्योतीनगर ८, पद्मपुरा ६, विशाल नगर ८, जालान नगर ५, उत्तरा नगरी ५, पांडुरंग नगर १, भवानी नगर  २, भूषण नगर १, एन-७ मध्ये ७, सिविल हॉस्पीटल ३, सुरेवाडी ३, प्रकाश नगर २, एचडब्लूपीटी १, एचएफडब्लूपीटीसी १,  काल्डा कॉर्नर १, बन्सीलाल नगर ५, कांचनवाडी ४, मिलकॉर्नर १, कैसर कॉलनी १, शिवाजी नगर ७, स्नेह नगर १, नक्षत्रवाडी २, चेतना नगर ३, उस्मानपुरा ७, हडको ३, सिडको ५, हर्सूल ४, रायगड नगर १, जाधववाडी ३, पन्नालाल नगर ३, मुकुंदवाडी १५, संदेश नगर १.

 कैलास नगर २, दर्गा रोड १, शंभुनगर १, एन-८ मध्ये ९, शास्त्री नगर १, मोंढा नाका २, एन-११ मध्ये ४, खोकडपूरा १, हनुमान नगर ४,  चिकलठाणा २, ब्रिजवाडी २, राहुल नगर १, अविष्कार कॉलनी १, रामनगर ३, नारळीबाग २, पिसादेवी रोड हर्सूल १, फाजलपूरा २, ईटखेडा ३,  बळीराम पाटील शाळा २, छावणी २, पडेगाव ४, एचसीईएस १, नंदनवन कॉलनी १, मिलिंद हायस्कुल २, शांतीपुरा १, रोझा बाग १, अंबिका नगर १, राम नगर २, देवळाई २, छत्रपती नगर ३, विठ्ठल नगर ४, न्यू हनुमान मंदिर १, एन-१ २, मातोश्री कॉलनी १, बालाजी नगर २, विवेक नगर १, विजय नगर २, एन-३ २, भोईवाडा १, आदित्य नगर १, सातारा परिसर ५, विमानतळ १, उद्योग निर्मल कमल १, देवगिरी कॉलनी १, न्यू हनुमान नगर २, टी.व्ही.सेंटर १, स्वांतत्र्य सैनिक कॉलनी २, एमपी लॉ कॉलेज १, नागेश्वरवाडी ३, भावसिंगपुरा २, अनंत भालेराव विद्या मंदिर १, रोकडिया हनुमान कॉलनी १, जाधवमंडी १, आ.कृ.वाघमारे शाळा १, इंदिराबाई पाठक महाविद्यालय ३.

समाधान कॉलनी १, गर्व्हमेंट कॉलेज ऑफ फार्मसी ३, आयडीबीआय बँक १, सिल्कमिल कॉलनी २, देवगिरी कॉलेज १, तापडिया नगर ५, साकार सृष्टी १, शिवशंकर कॉलनी २, पानदरीबा १, टाऊन सेंटर सिडको १, बायजीपूरा १, न्यायनगर २, मेहेर नगर ५, भानुदास नगर १, मुथियान नगर १, अलोक नगर १, जवाहर कॉलनी ३, म्हाडा कॉलनी १, श्रेय नगर २, भारत नगर १, टिळक नगर १, ज्ञानेश्वर नगर १,  गजानन नगर २, नाथ नगर २, विद्या नगर १, बापट नगर १, मोटेश्वर सोसायटी २, राजनगर २,  त्रिपाठी पार्क १, नवीन मिसारवाडी १, मिलकॉर्नर १, अजब नगर १, जटवाडा रोड २, औरंगाबाद महानगर पालिका १, वसंत दादा पाटील हायस्कूल १, कृषी अधिकारी कार्यालय १, काबरापुरा १, रेल्वेस्टेशन १, रशीदपुरा १, अलंकार सोसायटी १, संभाजी कॉलनी सिडको १, संकल्प नगर १, होनाजी नगर २, जिजामाता विद्यालय १.

 पवन नगर २, श्रीकृष्ण नगर ३, मयुर नगर १, नवजीवन कॉलनी १, टी पाँईट २, शांतिनिकेतन कॉलनी १, व्यंकटेश नगर १, घाटी १, मोतीवाला नगर १, कटकट गेट १,  बेगमपुरा १, खाराकुंआ २, कर्णपुरा १, जय विश्वभारती कॉलनी १, रेल्वे स्टेशन १, आकाशवाणी १, प्रताप नगर ४, सूर्यदीप नगर २, शहानूरमियॉ दर्गा ३, निलकंठ प्लाझा स्टेशन रोड १, शहानूरवाडी ४, रचनाकार कॉलनी २, राजा बाजार १, म्हाडा कॉलनी वेदांत नगर १, शहानगर १, शरद अपार्टमेंट १, दशमेश नगर १, म्हाडा कॉलनी १, गोळेगावकर कॉलनी १, गरम पाणी १, समाधान कॉलनी १, मामा चौक १, राजीव गांधी नगर १, सिंहगड कॉलनी २, अन्य ५३९ अन्य रग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज १८९ रुग्ण आढळले. त्यात बजाजनगर १७, लासूर स्टेशन १, हर्सूल सावंगी १, कन्नड ५, चिंचोली १, रांजणगाव ५, वाळूज २, शेंद्रा एमआयडीसी १, शहापूर बाजार १, पिसादेवी ६, माळीपूरा १, सुलीभंजन १, गंगापूर १, हर्सूल गाव ६, गोलटगाव १, तडेगाव १, सारा वैभव हर्सूल १, एन-१२ मध्ये १, देवगिरी व्हॅली मिटमिटा १, सिडको महानगर ६ मध्ये , वडगाव कोल्हाटी ७, साजापूर १, अन्य १२१ रुग्ण आहेत.

 आज पाच जणांचा मृत्यूः आज औरंगाबादेत ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या इंटिग्रेटेड डिसीज सर्विलन्स प्रोग्रामने (आयडीएसपी) जारी केलेल्या मीडिया बुलेटिनमध्ये आज औरंगाबाद जिल्ह्यात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा