औरंगाबादेत आज १,६०० नवे कोरोना रुग्ण, ३२ मृत्यू; ग्रामीण भागातील स्थिती चिंताजनक

0
68
प्रातनिधिक छायाचित्र

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या अद्यापही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज जिल्ह्यात १ हजार ६०० कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर तब्बल ३२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादेतील एन-११ स्मशानभूमीत ९ कोरोनाबाधितांना एकाचवेळी चिताग्नी देण्यात आला. आजही शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त रुग्ण आढळले आहेत. आज औरंगाबाद महापालिका हद्दीत ६१८ तर ग्रामीण भागात ९८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

 दरम्यान आज १ हजार ७३८ कोरोनाबाधितांना सुटी देण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद महापालिका हद्दीतील ९९२ तर ग्रामीण भागातील ७४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८९ हजार ७३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार ५७१ झाली आहे. आतापर्यंत २ हजार १३४ जणांचा कोरोनाने बळी घेतला असून सध्या १५ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज औरंगाबाद महापालिका हद्दीत आढळेल्या ६१८ रुग्णात सातारा परिसर १९, बीडबाय पास १६,  गारखेडा परिसर १३,  पिसादेवी रोड परिसर १७,  एन -१सिडको ११,  उल्का नगरी ८,  घाटी परिसर  ३,  विमानतळ  २,  रेल्वे स्टेशन कॅम्प  २,  देवगाव रंगारी , रेल्वे स्टेशन कॅम्प  १,  उस्मानपुरा १,  समर्थ नगर १,   कांचनवाडी ६,   पडेगाव६, शिवाजीनगर ८,   श्रीनिकेतन कॉलनी २, नंदनवन कॉलनी ३, देवळाई परिसर१२,  मिलकॉर्नर १,   सिडको एन -८ ४,   मुकुंदवाडी  २,   नाथनगर ५,   कॅनॉट सिडको ४,  हर्सूल ९, एन-९ सिडको  ३,  एन १२ मध्ये  ८,   राजाबाजार २, बंजारा कॉलनी १, नक्षत्रवाडी ४,  पैठण १,   जवाहर कॉलनी ३, भानुदास नगर २,  पदमपुरा ६,  अन्य ३, देवनगरी १,  हॉटेल गिरनार १,  एन-११ ४,  विटखेडा १,  एसआरपी कॅम्प २,  पटेल लॉन्स १, राजगुरु नगर १, नाईक नगर २,  काडलीवाल मार्बल ७, राज हिल्स १,  सर्वेश्वर नगर १,   साई नगर २, साऊथ सिटी  १,   देशमुख नगर २.

सिडको एन-७ पोस्ट ऑफिस १,  सिडको १, शांतिनिकेतन कॉलनी १, सुधाकर नगर २, गणेश प्लाझा १,  राजेश नगर १,  अलोक नगर १, पृथ्वी नगर २, वृंदावन कॉलनी १,  पेठे नगर २, फकीरवाडी १,  पुंडलिकनगर ४, पटेल नगर १,  प्रताप नगर १, आरेफ कॉलनी  १,   हायकोर्ट कॉलनी ४, मंजीत नगर १,  जटवाडा रोड परिसर ३, श्रीकृष्ण नगर १, नुतन कॉलनी १, आयएफएल फायन्सास १,  एन-६ सिडको २,  चिकलठाणा ५,  एन-३ सिडको २,  म्हाडा कॉलनी ४,  जय भवनीनगर ५,  गजानन नगर २,  संजय नगर १, एस टी कॉलनी ३,  एन-२ सिडको ३, रामनगर १,हनुमान  नगर ३एन-४ सिडको ४,  विश्रांती नगर २,   बजरंग नगर १, मुकुंद नगर १,   मुकुंदवाडी २,  श्रध्दा कॉलनी १, एमआयटी शाळा १, मयुर पार्क ७, महाजन कॉलनी १,  धर्तीधन सोसायटी १, गुलमोहर कॉलनी, एन-५ सिडको  ५,   नवनाथ नगर ४,    चेतना नगर १,    गणेश नगर २,  अरिहंत नगर २, बालाजी नगर १,सुतगिरणी चौक १,

खिवंसरा पार्क ५,विष्णू नगर १, निराला बाजार १, साई नगर १, विशाल नगर २, स्वप्ननगरी १, रेणूका नगर १,समता नगर २,  सिंधी कॉलनी १,शिवनेरी कॉलनी १,त्रिमुर्ती चौक ३,  देशमुख नगर २, विवेंकापुरा २, कैलास नगर १,  जाधवमंडी १, एन-७ सिडको  ५, कामनगर  कॉलनी १,नारेगाव २,घृष्मेश्वर कॉलनी १,हडको कॉर्नर १,   स्वामी विवेकानंद नगर १,  नवजीवन कॉलनी १, टेलिकॉम सोसायटी १, अशोक नगर १, लेबर कॉलनी १, कोहीनूर कॉलनी १,श्रेय न गर १, हिमायत बाग १,  राजनगर १ दलालवाडी १, टुरीस्ट होम १,  अजब नगर १,   बन्सीलाल नगर १, झेडपी ग्राऊड १,   वेदांत नगर १, मिल कॉर्नर १, पहाडसिंगपुरा १,  जालान नगर १,  शहानूर वाडी १, शिवशंकर कॉलनी १, अन्य २४१ रुग्ण आहेत.

ग्रामीण  भागात आज ९८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात तिसगाव  २,  करमाड  ३,  शेंद्रा ८,  पंढरपूर १,  गोकुळवाडी१, वाळूंज १, बजाजनगर १, कोलते टाकळी १,  निल्लोड १, वैजापूर १,   वरझडी २,  सिडको महानगर १,  एएस क्लब , वाळूज ३,अन्य ९५६  रुग्ण आहेत.    

ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण वाढलेः जिल्ह्यातील आज ३२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २३ मृत्यू हे घाटी रुग्णालयात झाले आहेत. तर जिल्हा रुग्णालयात २ आणि खासगी रुग्णालयात ७ मृत्यू झाले आहेत. आज मृत्यू झालेल्यांपैकी १७ मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत तर ६ मृत्यू हे शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा