खबरदारी घ्याः राज्यात दिवसभरात १६ हजार ६२० नवीन रुग्ण, ५० जणांचा मृत्यू

0
55
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून रविवारी दिवसभरात १६ हजार ६२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ५०  कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

 राज्यात सध्या १ लाख २६ हजार २३१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ लाख ३४ हजार ७२ वर पोहोचली आहे. दुसरीकडे आज राज्यभरात ८ हजार ८६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९२.२१ टक्के आहे. राज्यात सध्या २ लाख ८३ हजार ७२ जण होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार ४९३ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

आज आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांत मुंबईतील १ हजार ९६२, पुण्यातील १ हजार ७४० आणि नागपुरातील २ हजार २५२ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा असून ही रुग्णवाढ अशीच राहिली तर राज्याला पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा