औरंगाबादेत आज आढळले १,७१८ नवे कोरोना रुग्ण, ग्रामीण भागात सर्वाधिक संख्या; २७ मृत्यू

0
57
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद:  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज रात्रीपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आलेली असतानाच आज दिवसभरात औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ७१८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  विशेष म्हणजे आज आढळलेल्या रुग्णांपैकी तब्बल ९४७ रुग्ण हे ग्रामीण भागातील असून प्रथमच ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता  १ लाख ३ हजार २५४ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत २ हजार ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 दुसरीकडे आज महापालिका हद्दीतील ८५० आणि ग्रामीण भागातील ३८९ अशा एकूण १ हजार २३९ रुणांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८५ हजार ४०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण १५ हजार ८०२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

औरंगाबाद महापालिका हद्दीत आज ७७१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात सातारा परिसर ३९, बीड बायपास १९, पद्मपुरा ११, चिकलठाणा १२, रामनगर ८, नाईक नगर ७, उल्का नगरी ५, पुंडलिक नगर ५, औरंगाबाद ५, शिवाजी नगर ९, गारखेडा ७, जय भवानी नगर ८, घाटी २, सिडको १, केळीबाजार १, हायकोर्ट कॉलनी १, जटवाडा रोड ४, कासलीवाल मार्वल ४, सप्तश्रृंगी नगर १, न्यु नंदनवन कॉलनी १, माऊली नगर १, बालाजी नगर ५, नक्षत्रवाडी ४, वेदांत नगर ३, उस्मानपूरा ९, जालान नगर १, दशमेश नगर २, पडेगाव १०,  श्रीनिकेतन कॉलनी १, एसबीएच कॉलनी ४, आकाशवाणी १, भानुदास नगर १, शिल्प नगर ३, बनेवाडी १, प्रताप नगर ९, बन्सीलाल नगर २, साईनगर १, कांचनवाडी ७, सिडको एन-३ येथे ४, भावसिंगपुरा ६, द्वारकापुरी १, मिटमिटा ३, अजब नगर ५, शहानूरवाडी २, समर्थ नगर २, ऑरेंज सिटी पैठण रोड २, गजानन नगर ५, शंकर नगर १, न्यू विशाल नगर १.

विद्यानिकेतन कॉलनी १, एन-५ येथे ३, जाधववाडी ३, कैलाश नगर १, सिडको एन-४ येथे ८, हर्सूल ६, टाऊन सेंटर २, एन-२ येथे ६, कॅनॉट प्लेस १, एन-७ येथे १०, कुशल नगर १, राधास्वामी कॉलनी २, गोकुळवाडी १, नारळी बाग १, नुतन कॉलनी २, चौराहा २, नागेश्वरवाडी १, सहकार नगर ४, क्रांती चौक १, समता नगर ३, महेश नगर १, पगारिया निवास १, अजित सिड्स १, ज्योती नगर १, हर्सूल टी पाँईट २, संगीता कॉलनी १, भाग्योद्यय नगर २, देवळाई ७, शहा नगर १, मिलिंद नगर १, विजयंत नगर २, मंजूर प्राईड १, बाळापूर फाटा ३, आलोक नगर ४, ईटखेडा २, रामगोपाल नगर १, देशपांडे पूरम २, राज नगर १, गुरूप्रसाद नगर २,  मुकुंद नगर ३, प्रकाश नगर १, पुराणिक नगर १, महाजन कॉलनी १, सिंधी कॉलनी १, खोकडपुरा १, एन-६ येथे ७,  एस. टी. कॉलनी १, म्हाडा कॉलनी मुर्तिजापूर १, लायन्स क्लब कॉलनी १, महालक्ष्मी चौक १, म्हाडा कॉलनी १, विनय कॉलनी १, तारांगण नगर १, ज्ञानेश्वर नगर १.

एन-९ येथे ८, विठ्ठल नगर ३, राजीव गांधी नगर १, न्यू एस. टी. कॉलनी १, सुराणा नगर २, महावीर नगर २, ठाकरे नगर ३, गुरु सहाणी नगर १, मुकुंदवाडी ४, एन-१ येथे १, उत्तरानगरी १, हनुमान नगर १, दर्गा रोड १, विजय नगर १, भारत नगर १, विष्णू नगर १, खडकेश्वर ३, एन-११ येथे ३, भडकल गेट १, जूना बायजीपूरा १, रोझा बाग १, मल्हार चौक १, विशाल नगर ५, श्रीकृष्ण नगर १, परिजात नगर १, छत्रपती नगर २, पिसादेवी रोड ३, कोतवालपूरा १, होनाजी नगर १, प्रगती कॉलनी ४,  ज्युब्ली पार्क १, सारा वैभव २, नवजीवन कॉलनी २, मयुर पार्क ४, टीव्ही सेंटर ४, एन-१२ येथे ३, एमआयडीसी १, देशमुख नगर १, एन-८ येथे ५, एन-१० येथे १, फुले नगर १, जाधवमंडी १, सनी सेंटर १, नंदादिप हाऊसिंग सोसायटी १, साफल्य नगर १, म्हसोबा कॉलनी १, सुरेवाडी १, घृष्णेश्वर कॉलनी २.

दीप नगर १, पोलीस क्वार्टर मिलकॉर्नर १, दिवान देवडी १, हिमायत बाग १, एकता नगर १, नंदनवन कॉलनी १, अशोक नगर १, एम्स हॉस्पीटल १, समनानी नगर १, मिसारवाडी १,  ईएसआयसी हॉस्पीटल १, पन्नालाल नगर १, जवाहर कॉलनी २, साई हार्मोनी सोसायटी १, न्यायनगर १, नॅशलन कॉलनी १, स्वप्न नगरी १, सुधाकर नगर २, देवा नगरी  १, नवनाथ नगर १, दिशा संस्कृती पैठण रोड १, मिलिट्री कँम्प छावणी २, साईसंकेत सोसायटी १, न्यु हनुमान नगर २,  उत्तरा नगरी २, शिवशंकर कॉलनी १, एमआयटी कॉलेज १, कासारी बाजार १, सिल्कमिल कॉलनी १, जयानगर १, श्रेयनगर १, रेल्वेस्टेशन १, अन्य २७४ रुग्ण आहेत.

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज प्रथमच ९४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात बजाज नगर १, सिडको वाळूज १, ए ।एस ।क्लब वाळूज ३, वालसावंगी १, अजिंठा १, दावरवाडी १, सिल्लोड ३, हनुमंत खेडा १, वाळूज एमआयडीसी १, फुलंब्री १, पंढरपूर १, पिसादेवी ५, आडगाव सरक १, लासूर स्टेशन वैजापूर १, गिरनार तांडा १, चितेगाव १, केऱ्हाळा १, पळशी खुर्द कन्नड १, पैठण १, अंधारनेर कन्नड १, मांडकी १, हर्सूल गाव २, पळशी औरंगाबाद १, सावखेडा सिल्लोड १, गंगापूर १, पिंपळखुटा १, गिरिजा शंकर विहार १, लाडसावंगी १, कन्नड १, टोणगाव १, आसेगाव गंगापूर ३, अन्य ९०५ रुग्ण आहेत.

२७ रुग्णांचा मृत्यूः आज जिल्ह्यातील २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १८ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत. उर्वरित मृत्यूपैकी ३ मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात तर ६ मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. आजच्या मृत्यूपैकी १६ मृत्यू शहरी भागातील तर मृत्यू ११ ग्रामीण भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा