राज्यात आज २५ हजार ६८१ कोरोनाबाधित रुग्ण, ७० जणांचा मृत्यू

0
40

मुंबईः राज्यात आज पुन्हा एकदा विक्रमी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात राज्यात २५ हजार ६८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 राज्यात सध्या १ लाख ७७ हजार ५६० सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ लाख ८९ हजार ९६५ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत ५३ हजार २०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत १४ हजार ४०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

 राज्यात सध्या सक्रीय असलेल्या १लाख ७७ हजार ५६० रुग्णांपैकी सर्वाधिक सक्रीय ३७ हजार ३८४ रूग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ नागपुर जिल्ह्यात २५ हजार ८६१ सक्रीय रुग्ण आहेत. मुंबई महापालिका हद्दीत १८ हजार ८५० सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाणे जिल्ह्यात  १६ हजार ७३५ सक्रीय रुग्ण आहेत.

 आजपर्यंत राज्यात १ कोटी ८० लाख ८३ हजार ९७७ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी २४ लाख २२ हजार २१ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हीटीचे हे प्रमाण १३.३९ टक्के आहे. राज्यात सध्या ८ लाख ६७ हजार व्यक्ती होम क्वारंटाइन तर ७ हजार ८४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा