राज्यात आज आढळले २६ हजार ६४५ नवे कोरोना बाधित, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२२ टक्क्यांवर

0
22

मुंबईः राज्यात आज सोमवारी दिवसभरात २६ हजार ६४५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या काही शहरांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.

दरम्यान, आज १९ हजार ९४६३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत २२ लाख ३४ हजार ३३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात २ लाख १५ हजार २४१ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२२ टक्क्यांवर आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काल, रविवारी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३२ होते. १९ मार्च रोजी हेच प्रमाण  ९०.४२ टक्के होते.

दरम्यान, काही शहरांतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता काही शहरांत लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा टोपे यांनी आजच पत्रकार परिषदेत दिला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यात येत्या तीन महिन्यांत कोरोना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा