औरंगाबाद जिल्ह्यात आज ३२६ नवीन कोरोना रुग्ण, १७ मृत्यू

0
99

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज ३२६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तयात औरंगाबाद शहरातील १२१ रुग्ण आहेत तर ग्रामीण भागातील २०५ रुग्ण आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील १७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार २८४ सक्रीय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज औरंगाबाद शहरातील १९५ आणि ग्रामीण भागातील ३८६ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३२ हजार ३६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरनाबाधितांची संख्या  आता १ लाख ४० हजार ७३७ वर गेली आहे. तर आतापर्यंत ३ हजार ९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद शहरात आज १२१ रुग्ण आढळले. त्यात  सातारा परिसर ५, बीड बायपास ८, शिवाजी नगर २, गारखेडा परिसर १, राजा बाजार १, सिडको एन-६ येथे १, विजय नगर १, जवाहर कॉलनी १, आकाशवाणी १, कांचनवाडी १, राजीव नगर २, अमृतसाई प्लाझा १, पुष्प नगरी १, सिंधी कॉलनी २, मयूर पार्क १, एन-९ येथे १, पोलीस क्वार्टर मिलकॉर्नर १, हर्सूल २, गणेश नगर १, एस.टी.कॉलनी १, समर्थ नगर १, संतोषी माता नगर १, जय भवानी नगर ३, मुकुंदवाडी २, पडेगाव ३, एन-१२ येथे १, एन-८ येथे ५, एन-७ येथे १, ज्योती नगर १, संता नगर १, चिकलठाणा एमआयडीसी ४, हमालवाडा १, भूषण नगर १, एकता नगर १, भाग्य नगर १, एसआरपीएफ कॅम्प १, कटकट गेट १, उस्मानपुरा १, एन-१३ येथे १, न्यू उस्मानपुरा १, जिन्सी १, विद्युत कॉलनी १, अन्य ५२ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज २०५ रुग्ण आढळले. त्यात बजाज नगर ४, सिल्लोड १, नागापूर ता.कन्नड १, नायगाव १, ममनापूर ता.खुलताबाद १, कमलापूर १, कोहिनूर पार्क हाऊसिंग सोसायटी १, वडगाव कोल्हाटी १, पिसादेवी ४, सातारा गाव १, आवडे उंचेगाव ता.पैठण १, खुल्ताबाद १, दुर्गा नगर वैजापूर २, कन्नड १, अन्य १८४ रुग्ण आहेत.

१७ रुग्णांचा मृत्यूः आज जिल्ह्यातील १७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ११ मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत तर ७ मृत्यू शहरातील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ९ मृत्यू घाटीत झाले. २ मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात झाले तर ६ मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा