औरंगाबाद जिल्ह्यात ३५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण, एकाचा मृत्यू

0
59

औरंगाबाद: औरंगाबादवरील कोरोना संसर्गाचे संकट गडद होत चालले असून गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात ३५७ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५१ हजार ६४४ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत तर १ हजार २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 जिल्ह्यात गुरूवारी १६६ कोरोनाबाधितांना सुटी देण्यात आली. त्यात महापालिका हद्दीतील १४१ तर ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ६३५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

महापालिका हद्दीत गुरूवारी ३०८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात भोज हॉटेल परिसर ५,  उल्कानगरी ९,  घाटी परिसर ४, जाधवमंडी १, खाराकूआ २, छावणी ३, पडेगाव २, भावसिंगपुरा १, एन-१२ २, साफल्य नगर २, हर्सूल ७, टिळक पथ रोड १, सातारा परिसर ५, मयूर पार्क १, हडको ४, दिशा सिल्व्हर १, टीव्ही सेंटर १, पैठण रोड परिसर २, तापडिया नगर १, भगतसिंग नगर१, देवा नगरी १, कोटला कॉलनी १, हॉटेल अशोका परिसर १, समर्थ नगर ५,  कांचनवाडी १, म्हाडा परिसर १, मोंढा कॉलनी ४,  शहानूर वाडी ३, गुलमंडी १, पुंडलिक नगर ३, सिंधी कॉलनी १, शिवाजी नगर ३, जयभवानी नगर २, एन-११ सिडको १, कासलीवाल परिसर ४, देवळाई परिसर २, बीड बायपास ७, शहानुरमियां दर्गा १, सहकार कॉलनी १, गजानन कॉलनी १, मेडिआर्ट हॉस्पिटल परिसर १, लक्ष्मी नगर २, एन-८ १,  एन-६ सिडको ३, एन-४ सिडको ४, एन-५ सिडको १, मुकुंदवाडी २, एन-२ सिडको  ६, एन-१ सिडको ३,  हनुमान नगर ३, वेदांत नगर ३, चिकलठाणा १, पिसादेवी १, जाधववाडी ३, पडेगाव १, एसबी कॉलनी, औरंगपुरा ३, सुरेवाडी १, शिवनेरी कॉलनी २, श्रेय नगर ३, मिटमिटा १, पदमपुरा २, महावीर चौक २, सावंगी १, श्रीकृष्ण नगर १, बायजीपुरा ४, काल्डा कॉर्नर १, गारखेडा २, उस्मानपुरा २, रत्नाकर कॉलनी १, पीरबाजार १, मिलकॉर्नर १, जटवाडा परिसर १, भावसिंगपुरा १, साई वृंदावन कॉलनी ३, पैठण गेट परिसर १, एकनाथ नगर ३, देवगण रामगिरी १, नाथ व्हॅली २, बजरंग चौक ३, रामा इंटरनॅशनल हॉटेल परिसर १, आकाशवाणी परिसर १, स्वामी विवेकानंद नगर १, बसैये नगर ३, नंदनवन कॉलनी २, नारळीबाग १, अन्य १२२ रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचाः औरंगाबादः ग्रामीण भागातील पाचवी ते नववीचे वर्ग २० मार्चपर्यंत बंद, शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के

ग्रामीण भागात गुरूवारी ४९ रुग्ण आढळले. त्यात गंगापूर १, चितेपिंपळगाव १, इटखेडा परिसर ७, वडगाव २,बजाजनगर २, वाळूज महानगर ८, साऊथ सिटी १, जयटॉवर १, नक्षत्रवाडी ४, कुंभेफळ २, अन्य ३१ रुग्णांचा समावेश आहे.

एका कोरोनाबाधिताचा मृत्यूः घाटीत गारखेडा परिसरातील शिवाजी नगरातील ८३ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा