औरंगाबाद शहरात आज १२४, ग्रामीण भागात २५३ नवे कोरोना रुग्ण, २३ जणांचा मृत्यू

0
69
प्रातनिधिक छायाचित्र

औरंगाबाद: औरंगाबादेतील कोरोनाचा कहर हळूहळू कमी होऊ लागला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज ३७७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात औरंगाबाद शहरातील १२४ तर ग्रामीण भागातील २५३ रुग्णांचा समावेश आहे. एकीकडे रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतानाच दुसरीकडे मृतांची संख्या मात्र म्हणावी तशी कमी होताना दिसत नाही. आजही जिल्ह्यातील २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६८७ जणांनी कोरोनावर मात केली. त्यात औरंगाबाद शहरातील २५० आणि ग्रामीण भागातील ४३७ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ३१ हजार ७८० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ४११ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने ३ हजार ७५ जणांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात सध्या ५ हजार ५५६ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद शहरात आज १२४ नवे रूग्ण आढळले. त्यात बीड बायपास ५, सातारा परिसर ६, घाटी परिसर ४, पुंडलिक नगर ४, जाधववाडी ३, मुंकदवाडी ३, गुलमंडी ३, सिडको एन-८ येथे ४, सिडको एन-४ येथे ३,संजीवनी सोसायटी १, साफल्य सोसायटी १, बन्सीलाल नगर १, भावसिंगपुरा २, अयोध्या नगर १,  डीकेएमएम हॉस्पीटल १,  सम्राट नगर १, श्रेय नगर १, गारखेडा २, शिवाजी नगर १, अंजिक्य नगर १, तापडिया नगर  १, संतोषी माता नगर २, गणेश नगर २, विश्रांती नगर २, राजे सिध्दन हाऊसिंग सोसायटी  १, वसंत नगर १, केशर नगरी  १, नारेगाव १, निजमिया कॉलनी १, कटकट गेट २, पगारिया अपार्टमेंट भडकल गेट १, अहबब कॉलनी १, ज्योती नगर १, शहा बाजार १, जुना जकात नाका हर्सूल १, हर्सूल टी पांईट २, कुशल नगर १, एन-९ येथे २, एन-११ येथे १, एन-१ येथे १,सिडको  एन-७ येथे २, एन-१२ येथे १, अन्य ४७ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज २५३ नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यात वडगाव कोल्हाटी ५, खिंवसरा इस्टेट सिडको महानगर ३, रांजणगाव शेणपुंजी वाळूज ६, लोहगाव १, बजाज नगर २, वाळूज एमआयडीसी १, तिसगाव २, मांजरी ता.गंगापूर १, ता.कन्नड १, करोडी १, शेंद्रा एमआयडीसी २, पिसादेवी १, चिंचोली ता.पैठण १, दिशा संस्कृती कांचनवाडी २, नक्षत्रवाडी १, उमरखेडा ता.कन्नड १, चिकलठाणा १, पिशोर १, मेल्ट्रान ता.पैठण १, सोनेवाडी ता.पैठण १, दाडेगाव ता.पैठण २, जळगाव ता.पैठण ७, लिमगाव ता.पैठण १, सुलतानपुर ता.पैठण १, म्हस्की ता.वैजापूर १, विरगाव ता.वैजापूर २, गंगापूर रोड ता.वैजापूर २, भगूर ता.वैजापूर १, घायगाव ता.वैजापूर १, पाटील गल्ली ता.वैजापूर १, फुलेवाडी रोड ता. वैजापूर ३, कोल्ही ता.वैजापूर १, नवजीवन कॉलनी ता. वैजापूर १, टेंभी ता.वैजापूर १, मुस्ताफा पार्क ता.वैजापूर १, कोल्ही ता.वैजापूर १, भिलवाणी ता.वैजापूर २, शेळके वस्ती ता.वैजापूर २, शिरसगाव ता.वैजापूर १, लखनगंगा ता.वैजापूर १, विहमांडवा ता.पैठण १, लासूरा ता.पैठण १, अन्य १८३ रुग्ण आहेत.

२३ रुग्णांचा मृत्यूः आज जिल्ह्यातील २३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १४ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात १ तर खासगी रुग्णालयात ८ जणांचा मृत्यू झाला. आज मृत्यू झालेल्या रुग्णांत ग्रामीण भागातील १४ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण शहरी भागातील आहेत. मृतांपैकी १५ रुग्णांचे वय ६० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा