महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेकः ४०,९२५ नवे रूग्ण, २० मृत्यू; सक्रीय रूग्णसंख्या दीड लाखांच्या आसपास!

0
122
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४० हजार ९२५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ४९२ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्याच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

 राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात १४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या ६५ लाख ४७ हजार ४१० वर पोहोचली आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८ टक्के आहे.

हेही वाचाः ‘पत्नीच्या फायद्यासाठी सरकारी पदाचा वापर’: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हाय कोर्टाची नोटीस

 राज्यात आतापर्यंत ७ कोटी १ लाख ३२९ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यापैकी ६८ लाख ३४ हजार २२२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हिटीचे हे प्रमाण ९.७४ टक्के आहे. सध्या राज्यात ७ लाख ४२ हजार ६८४  व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत तर १ हजार ४६३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. कोरोना संसर्गाची साथ आल्यापासून राज्यात आतापर्यंत १ लाख ४१ हजार ६१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचाः पुरूषोत्तम ‘अर्थ’शास्त्रः ना पदासाठी अर्ज, ना मुलाखत पत्र; तरीही देशमुखांची अधिव्याख्यातापदी नियुक्ती!

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

आज ओमीक्रॉनचा एकही रूग्ण नाहीः राज्यात आज ओमीक्रॉन या नव्या कोरोना विषाणूची बाधा झालेला एकही रूग्ण आढळून आलेला नाही. राज्यात आतापर्यंत ८७६ ओमीक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४३५ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ८६ नमुन्यांचे जनुकीय चाचणी अहवाल येणे बाकी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा