कोरोना बळींचा उच्चांकः देशात २४ तासांत ४ हजार ३२९ रुग्णांचा मृत्यू

0
35

नवी दिल्लीः देशात कोरोनाचे थैमान सुरूच असून गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संकट रौद्ररुप धारण करत आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र चिंतेचा विषय बनले आहे. देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत ४ हजार ३२९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज, मंगळवारी सकाळी ही आकडेवारी जाहीर केली.

देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६३ हजार ५३३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर ४ लाख २२ हजार रुग्णांचा घरी सोडण्यात आले आहे. तर ४ हजार ३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होण्याची ही उच्चांकी आकडेवारी आहे.

भारतात आतापर्यंत २ कोटी ५२ लाख २८ हजार ९९६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २ कोटी १५ लाख ९६ हजार ५१२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत देशातील २ लाख ७८ हजार ७१९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या देशात ३३ लाख ५६ हजार ७६५ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा