औरंगाबादेत आज विक्रमी २,३७८ रुग्णांना डिस्चार्ज, ४४ रुग्णांचे मृत्यू; १,४९७ नवे रुग्ण!

0
226
प्रातनिधिक छायाचित्र

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत आज, शनिवारी दोन विक्रम नोंदवले गेले. आज जिल्ह्यातील विक्रमी २ हजार ३७८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन गेले आहेत. तर तब्बल ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज १ हजार ४९७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या १४ हजार २५४ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांमध्ये महापालिका हद्दीतील १ हजार ४६० आणि ग्रामीण भागातील ९१८ असे २ हजार ३७८ रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ८८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज आढळलेल्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १७ हजार ४८८ झाली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २ हजार ३४६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

 आज औरंगाबाद महापालिका हद्दीत ६१८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात बीड बायपास १७, शिवाजी नगर १५, सातारा परिसर १५, कांचनवाडी १४, गारखेडा परिसर ९, हर्सूल १२, मयुर पार्क ११, सिडको एन-२ येथे ९, उल्का नगरी ७, गजानन कॉलनी ८, पुंडलिक नगर ८, औरंगाबाद ५,  घाटी ५, पडेगाव ११, समर्थ नगर ५, मेल्ट्रॉन डीसीएचसी १, मिलिट्री हॉस्पीटल १, ईटखेडा ३, एन-७ येथे ११, एन-१२ येथे १, जटवाडा रोड ४, एन-४ येथे ५, गणेश नगर १, एमआयटी कॉलेज जवळ १, शहानूरवाडी ३, अक्षयदीप नगर १, जालान नगर ५, सुधाकर नगर १, नंदनवन कॉलनी ६, देवळाई चौक १, मुकुंदवाडी ५, साई नगर २, शिवकृपा कॉलनी २,  नाईक नगर ३, देशमुख नगर २, राजेंद्र नगर १, जाधववाडी ३, पवन नगर ४, गुरू दत्त्‍ नगर २, सिडको एन-६ येथे २, स्पंदन नगर १,  सिडको एन-५ येथे ३, जय भवानी नगर २, सिडको ४, कैलाश नगर १, अरिहंत नगर १, वेदांत नगर ३, पद्मपुरा ३, कोंकणवाडी १, उस्मानपुरा ५, देवळाई २, रेल्वेस्टेशन १, मिलिंद नगर १, विशाल नगर १, ज्योती नगर १, एन-३ येथे ४, स्टेशन रोड २, राहुल नगर १, पर्यटन कार्यालयासमोर १, पानचक्की १, भूषण नगर १, टाऊन हॉल २, दिल्ली गेट ४, अजब नगर २, सिटी चौक सराफा बाजार १, नारळी बाग २, भावसिंगपूरा २, पैठण गेट १, हर्सूल टी पाँईट १, ग्रीन व्हॅली १,  नारेगाव ४, समता नगर १, टी.व्ही.सेंटर ६, रामनगर ३, जय भवानी नगर २, न्यू गणेश नगर २, ठाकरे नगर ३, विश्रांती नगर २, न्यू हनुमान नगर ५, अंबिका नगर १, राजीव गांधी नगर १, तिरुपती कॉलनी १, प्रभु नगर १, टाऊन सेंटर १, एन-९ येथे ७, मुकुंदनगर २, गजानन नगर २, तोरणागड नगर १, एमआयडीसी चिकलठाणा २, परिजात नगर २, श्रध्दा कॉलनी १, विद्या नगर १, संजय नगर ५, गुरूसाक्षी हाऊसिंग सोसायटी २, सानप हॉस्पीटल १, न्यू मोती नगर १, नाथ नगर ४, प्रताप नगर २, विजय नगर १, आकाशवाणी २,  बालाजी नगर १, मयुरबन कॉलनी ४, बांद्रा नगर १, गजानन मंदिर १, भारत नगर १, रिंग रोड १, भोईवाडा २, सिंधी कॉलनी ४, काबरा नगर १, चिकलठाणा २, शिवशंकर कॉलनी १, बायजीपूरा १, आदिनाथ नगर १, छत्रपती हॉल हर्सूल १, म्हसोब नगर १, नवजीवन कॉलनी १, द्वारका नगर १, नवनाथ नगर २, राधास्वामी कॉलनी १, एन-१३ येथे १, पोलीस कॉलनी मिलकॉर्नर २, आरेफ कॉलनी २, म्हसोबा नगर २, टिळक नगर १, आकाशवाणी १, बजरंग चौक १, पिसादेवी रोड २, व्यंकटेश नगर ४, गौतम बुध्द नगर २, सतपाल नगर २, न्यू सौजन्यनगर १, रशिदपूरा १, केंब्रीज १, ओरंगपूरा १, बेगमपुरा २, संग्राम नगर १, साईसंकेत पार्क २, बाळकृष्ण नगर १, छपत्रती नगर १, नाथप्रांगण १, म्हाडा कॉलनी सातारा परिसर १, सिविल हॉस्पीटल १, सावित्री नगर १, श्रेय नगर २, नक्षत्रवाडी ३, दशमेश नगर १, बन्सीलाल नगर १, शीतल नगर १, नवीन वस्ती पद्मपूरा १, स्नेह नगर क्रांती चौक १, नागेश्वरवाडी २, ज्युब्ली पार्क १, कमलनयन बजाज हॉस्पीटल १, ज्योती नगर १, जाधवमंडी १, गुलमोहर कॉलनी १, दर्गा रोड १, ज्ञानेश्वर नगर १, प्रगती कॉलनी १, कटकट गेट १, भारत माता नगर १,  झाल्टा फाटा १, जवाहर कॉलनी ४, भवानी नगर मोंढा १, मित्र नगर १, एसबीओ शाळेसमोर २, खाराकुंआ १, पैठण गेट १, अन्य १७९ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ८७९ नवीन रुग्ण आढळले. त्यात बजाज नगर १३, वाळूज ६, सिडको वाळूज ३, सिडको महानगर १ येथे ८, ए.एस.क्लब ४, वडगाव १,  रांजणगाव ७, माळीवाडा २, लाडगाव करमाड १, टोकी १, गंगापूर २, बेलापूर १, गांधेली १, गेवराई कुबेर २, शिवना ता.सिल्लोड १, बिडकीन ३, पिसादेवी ४, एकतुणी ता.पैठण १, पैठण २, सावंगी ३, कोलठाण वाडी १, हळदा ता.सिल्लोड १, म्हसला १, निल्लोड, ता.सिल्लोड १, गाढे पिंपळगाव, ता.वैजापूर १, एन-११ येथे १, विरमगाव १, चिंचोली १, दौलताबाद १, साजापूर २, वडगाव कोल्हाटी १, तिसगाव १, वैजापूर २, रोटेगाव रेल्वे स्टेशन १, सुलतानपूर ता.पैठण २, पळसवाडी ता.खुल्ताबाद १, सुंदरवाडी २, दावरवाडी १, लासूर स्टेशन ता.गंगापूर १, अन्य ७८७ रुग्ण आहेत.

४४ रुग्णांचा मृत्यूः आज जिल्ह्यातील तब्बल ४४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ३० रुग्ण घाटी रुग्णालयात दगावले तर मिनी घाटी म्हणजेच जिल्हा सामान्य रुग्णालयात ३ आणि खासगी रुग्णालयात ११ रुग्ण दगावले आहेत. आज मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांत  १८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत तर २६ रुग्ण शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा