औरंगाबादेत तीन दिवसांत आढळले ४५१ कोरोना बाधित रुग्ण, आजची संख्या १५८ वर

0
315

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असून आज जिल्ह्यात १५८ रुग्ण सापडले. तर चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या तीनच दिवसांत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ४५१ वर पोहोचली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी १५६, बुधवारी १७३ रुग्ण आढळून आले होते.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ हजार २९३ झाली आहे. आजपर्यंत एकूण १ हजार २५० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या  ७०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आज मनपा हद्दीतील ४४, आणि ग्रामीण भागातील ११ सुटी  देण्यात आली. आजपर्यंत ४६ हजार ३४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

महापालिका हद्दीत १४३ रुग्णः घाटी परिसर २, नूतन कॉलनी १, गोलवाडी १, नाथ व्हॅली २, ज्ञानेश्वर नगर १, राम नगर, सिडको १, स्काय सिटी, बीड बायपास १, सह्याद्री नगर १, उल्कानगरी ३, शिवाजी नगर २, चेतना नगर १, इटखेडा २, सातारा परिसर २, श्रेय नगर १, सारंग सो. १, मातोश्री नगर १, आदर्श नगर १, पन्नालाल नगर २, संत तुकोबा नगर १, ब्ल्यू बेल सोसायटी १, स्पंदन नगर १, कासलीवाल पार्क १, राम नगर १, गुरूसहानी नगर १, एसबीआय निवासस्थान परिसर १, राजेश नगर, बीड बायपास १, गुलमंडी परिसर १, ओमकार गॅस एजन्‌सीच्या मागे २, पारिजात नगर, एन पाच १, सम्यक आर्केड  १, एन पाच श्रेय नगर २, जटवाडा रोड १, सुंदर नगर, नागेश्वरवाडी १, एन तीन सिडको १, एन पाच सिडको १, बीड बायपास १, विष्णू नगर, आकाशवाणी परिसर १, अप्रतिम सो., सातारा परिसर १, एन सात सिडको १, मयूर पार्क हडको १,  पैठण रोड २, हर्सूल, पिसादेवी १, हनुमान नगर १, ज्योती नगर १, न्यू गणेश नगर २, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ १, बन्सीलाल नगर १, अलोक नगर १, छावणी परिसर १, एन सहा, सिडको १, बालाजी नगर १, अन्य ८० 

ग्रामीण भागात १५ रुग्णः नागद, कन्नड १, वाघुली १, हिवरखेडा, गौताळा १, शिऊर, वैजापूर १, कन्नड १, कडेठाण, पैठण १, वडगाव कोल्हाटी १, अन्य ८

चार कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत संजय नगर, बायजीपुऱ्यातील ३८ वर्षीय पुरूष, पैठण तालुक्यातील पाचोड येथील ७५ वर्षीय स्त्री, चिखलठाण्यातील सविता मंगल कार्यालय येथील ६५ वर्षीय पुरूष आणि वरूडकाझी, करमाड येथील ५२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा