धोका वाढलाः औरंगाबादेत एकाच दिवशी कोरोनाचे ४५९ नवे रुग्ण, ५ जणांचा मृत्यू; राज्यातही उद्रेक

0
56

औरंगाबाद: औरंगाबादेतील कोरोनाचे संकट गडद होत चालले असून शुक्रवारी एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल ४५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आढळून आलेल्या रुग्णांपैकी ३५३ रुग्ण औरंगाबाद शहरतील असून १०६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सध्या जिल्ह्यात २ हजार ९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, शुक्रवारी औरंगाबाद महापालिका हद्दीतील १५२ आणि ग्रामीण भागातील २७ अशा १७९ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ५२ हजार १०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर १ हजार २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद शहरात शुक्रवारी ३५३ रुग्ण आढळले. त्यात खिंवसरा, एमआयडीसी रोड १, एन सात सिडको ७, जाधववाडी ५, पडेगाव ३, एकनाथ नगर ५, ज्योती नगर ७, नवाबपुरा १, विशाल नगर ३, अदालत रोड १, जय नगर १, पद्मपुरा ३, दिवाण देवडी १, छावणी १, आदर्श नगर १, बन्सीलाल नगर ३, दशमेश नगर ३, सादिया नगर १, बंजारा कॉलनी १, कबीर नगर १, नक्षत्रवाडी १, समर्थ नगर ४, वेदांत नगर १, मिटमिटा १, एन सात पोलिस कॉलनी १, खडकेश्वर १, किल्लेअर्क १, नागेश्वरवाडी १, संघर्ष नगर १, भावसिंगपुरा १, एन दोन सिडको २, कासलीवाल मार्बल १, एन नऊ २, श्रीनाथ रेसिडन्सी परिसर हर्सुल १, संभाजी कॉलनी १, सिद्धीपार्क जटवाडा रोड ३, गुरू शाश्वत कॉलनी १, सारा परिवर्तन, सावंगी ५, बजरंग चौक १, लक्ष्मण कॉलनी १, दिशा नगरी, बीड बायपास १, गुलमंडी १, इंडियाना रेस्टॉरंट परिसर २, सराफा रोड १, गारखेडा ६, राम नगर १, नारळीबाग २, प्रताप नगर ३, अजब नगर १, बुक मार्केट १,  माया नगर १, हडको ३, मुकुंदवाडी ३, सातारा परिसर ५, एन तीन सिडको २, एन आठ सिडको ५, शिवाजी नगर ५, रोकडिया हनुमान  कॉलनी १, मित्र नगर २, टीव्ही सेंटर १, गुरू सहानी नगर १, पिसादेवी २, उत्तरानगरी १, राजीव गांधी नगर १, दर्शन विहार, बीड बायपास १, जय भवानी नगर ४, जय भारत कॉलनी चिकलठाणा १, हनुमान नगर १, चौधरी कॉलनी १, फन रेसिडन्सी हॉटेल १, अंबिका नगर १, पुंडलिक नगर ३, गुरू दत्त नगर १, हर्सुल ४, ठाकरे नगर १, बीड बायपास ६, एन बारा, स्वामी विवेकानंद नगर १, छत्रपती नगर २, इटखेडा १, शिवनेरी कॉलनी ४, द्वारकानगरी १, सिंधी कॉलनी ४, अजंटा हा.सो ३, महर्षी विद्यालय १, सिंधू मेमोरिअल स्कूल १, गादिया विहार १,  शिवशंकर कॉलनी १, तापडिया नगर १, जय भवानी विद्या मंदिर १, आदित्य नगर १, सूतगिरणी चौक १, जवाहर नगर १, न्यू बालाजी नगर २, एन सहा साई नगर १, म्हाडा कॉलनी ३, टिळक नगर, गारखेडा २, हनुमान नगर १, उल्कानगरी ५, रोशन गेट १, बसय्यै नगर १, अयोध्या नगर १, राजे संभाजी कॉलनी १, श्रेय नगर २, अरिहंत नगर १, पंचशील नगर १, भानुदास नगर १, न्यू उस्मानपुरा १, नंदनवन कॉलनी ३, एन पाच, सत्यम नगर १, पेठे नगर १, जैन नगर १, गवळीपुरा १, बालाजी नगर १, नागसेन नगर, उस्मानपुरा २, कांचन नगर १, संजय नगर १, सिडको १, एन नऊ एम दोन १, अन्य १३३ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या १०६ रुग्णांमध्ये  पळशी १, बोरगाव १, खुलताबाद २, कन्नड ३, पालगाव १, गंगापूर १, वाळूज ३, फुलंब्री १, बजाज नगर ७, रांजणगाव १, वळद गाव १, अन्य ८४ रुग्ण आहेत.

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत मुकुंदवाडीतील ६५ वर्षीय पुरूष, खुलताबाद तालुक्यातील नांदराबाद येथील ६६ वर्षीय पुरूष, नंदनवन कॉलनीतील ७९ वर्षीय पुरूष, फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार ५८ वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात ७३ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 राज्यातही उद्रेकः दरम्यान, राज्यभरातील कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली असून शुक्रवारी राज्यात १० हजार २१६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांतील हा कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक आहे. शुक्रवारी राज्यात ६ हजार ४६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात कोरोनाचे ८८ हजार ८३८ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५२ टक्के आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा