औरंगाबादेत एकाच दिवशी ५३२ नवे कोरोना रुग्ण, ७ जणांचा मृत्यू

0
44
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून बुधवारी एकाच दिवशी जिल्ह्यात ५३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५४ हजार ४३९ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा १ हजार ३११ वर पोहोचला आहे.

 दरम्यान बुधवारी महापालिका क्षेत्रातील १८८ आणि ग्रामीण भागातील ४३ अशा २३१ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ४९ हजार ६१३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या ३ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बुधवारी महापालिका हद्दीत तब्बल ४४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आङेत. त्यात उल्कानगरी ९, घाटी परिसर ६, हरीराम नगर  १, आदित्य नगर २, सातारा परिसर  ४, आयएमए हॉल १, एन-८ सिडको ४, पीर बाजार १, जालन नगर २, स्टेशन रोड परिसर २, बीडबाय पास परिसर ९, मयूर पार्क ३, सिडको  १२, मुकुंदवाडी ३, कैलास नगर २,संजय नगर २, एन-५ सिडको ४, एन-९ सिडको ३, उस्मानपुरा ४, शहानुरवाडी ६, पिसादेवी रोड परिसर १, त्रिमूर्ती चौक २, भवानी नगर २, चिकलठाणा २, एन-६ सिडको ५, पडेगाव २, अजबनगर २, तापडिया नगर १, हिंदुस्थान आवास २, एसबीएच कॉलनी ३, पुष्प नगरी ४, शिल्प नगर १, औरंगपुरा १, श्रीनिकेतन कॉलनी १, बालाजी नगर ७, वेदांत नगर २, कांचनवाडी १, ज्योती नगर २, एन-२ सिडको ८, प्रताप नगर ४, गारखेडा ६, पुंडलिक नगर ४, बन्सीलाल नगर २, रेल्वे स्टेशन परिसर ५,  पद्मपुरा १, एकनाथ नगर १,जाधववाडी १, नाथ व्हॅली रोड परिसर १, जटवाडा २,टीव्ही सेंटर १, समर्थ नगर २, शाह कॉलनी १,  मनीष कॉलनी १, शेरवन टावर २, सराफा रोड १, हायफिल्ड प्रा.लि १, हर्सूल ८, शास्त्री नगर २, शाकुंतल नगर १, न्यायमूर्ती नगर १, शाह बाजार १, हडको ३, नवीन मोंढा १, शिवेश्वर कॉलनी १, माऊली नगर ४, बजाज हॉस्पिटल १, पैठण रोड परिसर १, जयसिंगपूरा १, एन-३ सिडको १, म्हाडा कॉलनी १, हायकोर्ट परिसर २, टाऊन सेंटर १, एन-४ सिडको ४, कामगार चौक १, जय भवानी नगर ७,संघर्ष नगर १, शाहनगर १, हनुमान नगर ४, हॉटेल फर्न रेसिडेन्सी १, एन-७ सिडको ५, आकाशवाणी ३, स्वामी विवेकानंद नगर १,खिवंसरा पार्क १,बजरंग चौक २, शिवाजी नगर ७, संदेश नगर १, गजानन नगर १, गादिया विहार १, मेहेर नगर १,विष्णू नगर ३, मयूरबन कॉलनी १, देवळाई परिसर ३, चौरंगी हॉटेल १,  सिंधी कॉलनी ३,शंभू नगर १, अग्निहोत्री चौक १, शिवशंकर कॉलनी ३, कलेक्टर ऑफीस परिसर १, सिंधू कॉलनी १, नक्षत्रवाडी १,  शिवनेरी कॉलनी १, व्यंकटेश नगर १, सेंट्रल नाका २,  टिळक नगर ३,  सुराणा नगर २,  राम नगर १, सदानंद नगर १, सह्याद्री नगर सिडको १,   दशमेश नगर २, श्रेय नगर २, इटखेडा ३, आरटीओ ऑफिस परिसर १, सिद्धार्थ नगर १, राधामोहन कॉलनी १, खडकेश्वर १, नागेश्वरवाडी २, अन्य १६२ रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात आढळलेल्या ८९ रुग्णांमध्ये गंगापूर १, करमाड २,वरुडकाझी १, बजाज नगर १६, वडगाव ४, वाळूज महानगर ४,सिडको महानगर २,पंढरपूर १, वळदगाव १,पैठण१,खुलताबाद१,शेंद्रा  २, वडगाव १,  अन्य ५२ रुग्णांचा समावेश आहे.

सात कोरोनाबाधितांचा मृत्यूः  घाटीत माळीवाडा, औरंगाबाद येथील ६४ वर्षीय पुरूष, हुसेन कॉलनी, गारखेडा येथील ७० वर्षीय पुरूष, सांगवी, लासूर स्टेशन येथील ७५ वर्षीय पुरूष , खुलाताबाद तालुक्यातील आझमपूर येथील ६० वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयांमध्ये नारळीबाग येथील ३७ वर्षीय पुरूष, क्रांती चौकातील  ७० वर्षीय स्त्री, श्रद्धा हॉस्पीटल परिसरातील ७१ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा