नांदेड जिल्ह्यात आज आढळले ५६६ नवे कोरोनाबाधित रूग्ण, दोघांचा मृत्यू

0
22
प्रतिकात्मक छायाचित्र.

नांदेडः नांदेड जिल्ह्यात आज तपासणी करण्यात आलेल्या २ हजार ६६९ अहवालापैकी ५६६ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे २५५ तर अँटिजेन तपासणीद्वारे ३११ अहवाल बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या २६ हजार ९५७ एवढी झाली आहे. शनिवार १३ मार्च २०२१ रोजी सिडको नांदेड येथील ४५ वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे तर वजिराबाद येथील ५८ वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या ६१६ वर पोहोचली आहे.

आजच्या २ हजार ६६९ अहवालापैकी २ हजार २१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २६ हजार ९५७ एवढी झाली असून यातील २३ हजार ७४१ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. एकुण २ हजार ३८० बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ५२ बाधितांची प्रकृती अतिगंभीर स्वरुपाची आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ८८.०६ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १८९, अर्धापूर तालुक्यात ३, बिलोली १, हिमायतनगर १२, किनवट ३, मुदखेड ५, नायगाव ५, निजामाबाद १, परभणी १, यवतमाळ २, नांदेड ग्रामीण १५, भोकर १, हदगाव १, कंधार १, लोहा ६, मुखेड ५, उमरी १, हैदराबाद १, हिंगोली २ असे एकूण २५५ बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २२५, अर्धापूर तालुक्यात ४, देगलूर ८, हदगाव ४, किनवट ८, लोहा १०, मुदखेड १, उमरी १, हिंगोली २, नांदेड ग्रामीण १५, बिलोली २, धर्माबाद ८, भोकर ३, हिमायतनगर ३, माहूर ९, मुखेड १, परभणी ५, यवतमाळ २ असे एकूण ३११ बाधित आढळले.

जिल्ह्यात २ हजार ३८० बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ९३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ७९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) ३८, किनवट कोविड रुग्णालयात ४०, मुखेड कोविड रुग्णालय ४०, हदगाव कोविड रुग्णालय ४, लोहा कोविड रुग्णालय १३, महसूल कोविड केअर सेंटर १४०, देगलूर कोविड रुग्णालय ९, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण १ हजार ३७४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ३६१, खाजगी रुग्णालय १८९ आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा