औरंगाबादेतील सक्रीय रुग्णसंख्येत लक्षणीय घट, आज आढळले ५७८ नवे कोरोनाबाधित रुग्ण

0
73
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत गेल्या पंधरवड्यापासून लक्षणीय घट होत आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात ५७८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६ हजार ३४३ सक्रीय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज औरंगाबाद शहरातील ११२ आणि ग्रामीण भागातील ४३४ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख २९ हजार २८९ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत २ हजार ९८१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ६१३ वर पोहोचली आहे.

औरंगाबाद शहरात आजड २१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यात जयभवानी नगर ८, सिडको एन-७ येथे ५, शिवाजी नगर ३, घाटी परिसर १, सिडको १, देवळाई २, गारखेडा २, सातारा परिसर २, बीड बायपास रोड १, खडी रोड १,अलाल कॉलनी १, शहानूरमियाँ दर्गा १, अरिहंत नगर ३, गणेश नगर २, गजानन कॉलनी २, आकशावाणी १, राज नगर १, पद्मपुरा १, नाथ नगर १, हनुमान नगर १, न्यू हनुमान नगर १, संजय नगर ३, न्यू गणेश नगर १, पुंडलिक नगर १, खाराकुआँ १, सुधाकर नगर १, लक्ष्मी कॉलनी १,मयूर पार्क ३, जाधववाडी १, ऑडिटर सोसायटी १, भाग्य नगर १, उल्का नगरी १, भावसिंगपुरा १, रेणूका नगर १, हर्सूल जेल २, एमआयडीसी चिकलठाणा १, वसंत नगर १, सिडको  एन-४ येथे २, सिडको एन-२ येथे २, एन-१० येथे १, एन-११ येथे ३, सिडको एन-५ येथे १, सिडको एन-६ येथे १, सिडको एन-१ येथे १, सिडको एन-८ येथे १, एन-१३ येथे १, सिडको एन-९ येथे १, अन्य १३८ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ३६४ रुग्ण आढळले. त्यात हिंदुस्तान आवास कांचनवाडी २, नक्षत्रवाडी १, रांजणगाव २, बजाज नगर ३, डोणगाव ता.कन्नड १, चिकलठाणा ३, देवराई रोड १, पडेगाव १, वडाखा १, परसोडा ता.वैजापूर १, चित्ते पिंपळगाव १, मार्केट यार्ड रोड ता.गंगापूर १, पिसादेवी १, मानकी पो. पालेदवी १, हर्सूल सावंगी ३, नायगाव १, एमआयडीसी वाळूज १, गोलवाडी २, पळशी तांडा १, मुलानी आडगाव ता.पैठण १, दादगाव १, झाल्टा पो.चिकलठाणा १, हरसिध्दी नगर कमळापूर वाळूज रोड १, सारा वृदांवन सिडको गार्डन वडगाव कोल्हाटी १, रांजणगाव पोळ ता.गंगापूर १, बकवाल नगर नायगाव १, सिडको वाळूज हॉस्पीटल २, शिवनेरी कॉलनी रांजणगाव १, माळीवाडा १, अन्य ३२५ रुग्ण आहेत.

१५ रुग्णांचा मृत्यूः गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ९ रुग्णांचा मृत्यू घाटी रुग्णालयात झाला तर ६ रुग्ण खासगी रुग्णालयात दगावले. आज झालेल्या मृत्यूपैकी १० मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत तर ५ मृत्यू हे शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा