औरंगाबादेत आज ७४४ नवे रूग्ण, २४ रूग्णांचा मृत्यू

0
109

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ७४४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८ हजार ६३७ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने आढळून येणारे कोरोनाबाधित रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांची संख्या आता निम्म्यावर आली आहे.

आज औरंगाबाद शहरातील ५२४ आणि ग्रामीण भागातील ५९९ अशा १ हजार १२३ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख २० हजार २४० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ३१ हजार ६१० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत २ हजार ७३३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आज औरंगाबाद शहरात २८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आज आढळलेली रुग्णसंख्या ही गेल्या काही दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहेत. आज आढळलेल्या रुग्णात सातारा परिसर ४, गारखेडा ७, बीड बायपास ८, शिवाजी नगर २, नाथ नगर १, पडेगाव ४, श्रेय नगर २, अजंठा नागसेन हॉस्टेल १, कांचनवाडी ८, जाधववाडी १, हर्सूल २, वानखेडे नगर २, सिडको एन-१२ येथे १, मयूर पार्क २, रशिदपुरा १, हिलाल कॉलनी १, नंदनवन कॉलनी २, हडको कॉर्नर १, पद्मपुरा १, देवगिरी व्हॅली १, रणजीत नगर १, मुकुंदवाडी १, जवाहर कॉलनी १, नक्षत्रवाडी १, जैन मंदिर १, देवळाई १, जय भवानी नगर ६, न्यु विशाल नगर २, पुंडलिक नगर ४, देशपांडे विहार १, देशपांडे नगर १, खोकडपुरा १, काबरा नगर १, स्वप्न नगरी १, न्यू हनुमान नगर ३, न्याय नगर ४, नाथ प्रांगण १, तान्हाजी चौक १, टी.व्ही.सेंटर २, लोकशाही कॉलनी १, नवजीवन कॉलनी १, एन-३ येथे २, एन-२ येथे १, मुकुंद नगर १.

आंबेडकर नगर १, एन-९ येथे ४, नवाबपुरा १, होनाजी नगर १,  भावसिंगपुरा २, शहागंज २, आरिफ कॉलनी १, सिडको एन-६ येथे ३,  सिडको एन-८ येथे ५, एकता नगर १, एम्स हॉस्पीटल १, कॅनॉट १, शहानूरवाडी ४, चिकलठाणा १, जाधववाडी १, साई कॉलनी पिसादेवी रोड १, एन-११ येथे २, म्हसोबा नगर १, गजानन मंदिर १, एन-१ येथे ४, रामनगर १, पेठे नगर १, मनजीत प्राईड २, रोशन गेट १, बन्सीलाल नगर १, मामा चौक पद्मपूरा १, घाटी ४, ज्ञानेश्वर नगर १, उर्जा नगर २, आकाशवाणी ४, ब्ल्यू बेल एमआयडीसी २, अल्तमश कॉलनी १, विमानतळ १, मेल्ट्रॉन डीसीएचसी २, पैठण रोड १, लेबर कॉलनी १, गणेश कॉलनी १, उस्मानपुरा १, म्हाडा कॉलनी १, ईटखेडा १, लक्ष्मी कॉलनी १, स्टेशन रोड २, सुधाकर नगर २, आयोध्या नगर १, कोकणवाडी १, एन-५ येथे २, अन्य ११५ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ४९० नवीन रुग्ण आढळले. त्यात बजाज नगर ७, सिडको वाळूज महानगर-१ येथे ३, एमआयडीसी वाळूज १, वडगाव कोल्हाटी १, रांजणगाव ६, आडगाव १, पिसादेवी ५, करमाड १, लिंबे जळगाव १, ताड पिंपळगाव ता. कन्नड २, वैजापूर १, सोयगाव १, पिंपळखुटा १, मांडकी २, सिल्लोड १, हातनूर ता.कन्नड १, गोलटगाव १, वाडी पिंपरखेड १, सारा आकृती १, माळीवाडा दौलताबाद १, शहजातपूर लासूर स्टेशन १, पिंपळवाडी १, हिरडपुरी ता.पैठण १, बोरवाडी ता.वैजापूर १, अन्य ४४७ रुग्ण आहेत.

२४ रुग्णांचा मृत्यूः जिल्ह्यातील २४ कोरोनाबाधित रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. आज झालेल्या मृत्यूंपैकी १२ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले. ३ रुग्णांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर ९ रुग्णांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.  आज झालेल्या मृत्यूपैकी १५ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत तर ९ रूग्ण शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा