औरंगाबादेत आज ८०१ नवे कोरोनाबाधित रुग्ण, ३१ रुग्णांचा मृत्यू

0
54
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी कमी होताना दिसत आहे. आज जिल्ह्यात ८०१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वात कमी संख्या आहे. दुसरीकडे आज जिल्ह्यातील ३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार ९७७ वर पोहोचली आहे तर २ हजार ५८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज महापालिका हद्दीतील ६९६ आणि ग्रामीण भागातील ८५१ असे १ हजार ५४७ जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख १४ हजार ८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ३०० सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही लक्षणीयरित्या कमी झालेली आहे.

आज औरंगाबाद महापालिका हद्दीतल ३२० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात पेठे नगर ४, सातारा परिसर ६, बसैये नगर ४, एन-२ सिडको  येथे २, एन-७ सिडको येथे १, एन-६ सिडको येथे ५,  एन-३ सिडको येथे १,  एन-९ सिडको येथे २, एन-११ हडको येथे २,    एन-८ सिडको येथे ६, एन-५ सिडको येथे १,एन-१२ येथे १,   मयूरपार्क, एअरपोर्ट १, समर्थ नगर १, मूर्तिजापूर म्हाडा कॉलनी १, बायजीपुरा १, न्यू हनुमान नगर १, शिवशंकर कॉलनी १, देवळाई परिसर ३, जवाहर कॉलनी १, देवानगरी १, कासलीवाल मार्वल १, कांचनवाडी २, नक्षत्रवाडी १, शिवाजी नगर २, बीड बायपास परिसर  ६, दर्गा रोड परिसर २, पहाडसिंगपुरा १, नंदनवन कॉलनी २, ओमसाई नगरी १, कॅनॉट प्लेस १, पिसादेवी २, औरंगपुरा २, संतोषी माता नगर १, संजय नगर १, जाधववाडी ३, सारा वैभव २, सावंगी ३, नारेगाव १, होनाजी नगर१, मिल कॉर्नर ३, हर्सूल ३, अशोक नगर १, सहकार नगर १, चाणक्य पुरी २, चिकलठाणा २, विशाल नगर २, पोलीस कॉलनी १, पिसादेवी १, दत्त नगर १, जालान नगर १, उत्तम नगर १, वेदांत नगर २,  उस्मानपुरा १, दिवाणदेवडी २, अन्य २१६ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ४८१ रुग्ण आढळले. त्यात इटखेडा १, पैठण २,फुलंब्री १, लाडगाव १, रांजणगाव १,  बजाजनगर २, वडगाव १, सिडको महानगर-१२, तिसगाव सिडको १, सिल्लोड  अन्य ४६८ रुग्ण आहेत.

३१ रुग्णांचा मृत्यूः जिल्ह्यातील ३१ कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यापैकी २३ रुग्णांचे मृत्यू घाटी रुग्णालयात झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन तर ६ रुग्णांचे मृत्यू खासगी रुग्णालयात झाले. आज मृत्यू झालेल्या रुग्णांत २१ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत तर १० रुग्ण हे शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा