चिंताजनकः राज्यात दिवसभरात आढळले ८ हजारांपेक्षाही जास्त कोरोनाबाधित रूग्ण, ८ मृत्यू

0
168
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. पुणेस मुंबईसह राज्यातील अन्य प्रमुख शहरांतील दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ०६७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर ८ कोरोनाबाधित रुग्णांचे निधन झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. आरोग्य विभागाने आज जारी केलेली ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

 राज्यातील कोरोना रूग्ण आणि ओमीक्रॉन विषाणूबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई, ठाणे, पुणे येथील कोरोना रुग्ण संसर्गाचा दर वाढत चालला आहे. राज्यात आज १ हजार ७६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५ लाख ९ हजार ९६ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दर ९७.४६ टक्के आहे. राज्यात सध्या १ लाख ७५ हजार ५९२ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत, तर १ हजार ७९ व्यक्ती संस्थातेमक क्वारंटाईन आहेत. पुण्यात गेल्या २४ तासात ४१२ नवीन कोरोनाबाधित आढळले असून पुण्यातील सक्रीय रूग्णांची संख्या १ हजार ७९९ वर गेली आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

राज्यात आज ओमीक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेले ४ रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रूग्ण पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) रिपोर्ट केले आहेत. नवी मुंबई, वसई-विरार, मीरा भाईंदर आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एक ओमीक्रॉनबाधित रूग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात ४५४ ओमीक्रॉन विषाणूबाधित रूग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १५७ रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

…तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही- वडेट्टीवारः  राज्यातील कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असा इशारा राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

लॉकडाऊन कधी लागणार?: वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये कोरोनाची स्फोटक परिस्थिती निर्माण होईल. कोरोना वेगाने पसरतो आहे. त्यामुळे नियंत्रण लोकांच्या हातात आहे. आपण कसे रहायचे, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये, हे लोकांनी ठरवायचे आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. मागील वेळी रेल्वे, विद्यार्थी, किंवा इतर जे काही निर्बंध लावले होते, त्या सर्व गोष्टींचा विचार करता आता लॉकडाऊनची स्थिती येते आहे. हा लॉकडाऊन कधी लावायचा याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही वडेट्टीवार यांनी टीव्ही९ शी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा