औरंगाबादेत कोरोना निर्बंधांच्या आदेशात सुधारणा, जाणून घ्या काय आहेत सुधारित आदेश

0
353
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: कोरोना संसर्गसाखळी तोडण्यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने २८ जून रोजी सविस्तर आदेश जारी केले होते. या आदेशातील काही बाबतीत सुधारणा करण्यात आली आहे. आता जिल्ह्यात सुधारित आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

लग्न समारंभः तिथीनुसार पूर्वनियोजित साखरपुडा/हळदी/लग्न इत्यादी कार्यक्रम असल्याने त्यासाठी शनिवार व रविवारच्या आठवडी लॉकडाऊनच्या निर्बधांबाबत शिथिलता देण्यात आली आहे. याशिवाय इतर समारंभ/ कार्यक्रमासाठी शनिवारवर- विवारी ग्राहक/पाहूणे/हॉटेल- मंगल कार्यालयात आल्यास दंडात्मक/ सिलिंगची कारवाई करण्यात येईल.

मॉलः फूड कोर्ट, आसन व्यवस्थेसह असलेले खाद्यगृहे, इत्यादी ठिकाणी केवळ होम डिलिव्हरी पार्सल सुविधा रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील.

पर्यटन स्थळेः बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला ही पर्यटनस्थळे सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील.  दुपारी ४ वाजता पर्यंटक पर्यटनस्थळावरून बाहेर पडणे अनिवार्य राहील. सायंकाळी ५ वाजेनंतर कुठेही वावरण्यास मनाई राहील. सकाळच्या सत्रात ५०० पर्यटक आणि दुपारच्या सत्रात ५०० पर्यटकांना अनुमती असेल.

घरगुती गॅस सिंलिडंर पुरवठाः  फक्त सकाळी ७ते रात्री ८ वाजेपर्यंतच करण्याची परवानगी राहील.

सर्व बाबींसाठी कोरोना सुयोग्य वर्तन अनिवार्य आहे. मास्क वापरणे, दो गज की दुरी, (६ फूट अंतर), सॅनिटायझर आणि आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य राहील.

 या सुधारित आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत लागू राहील. या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध  आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ च्या कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहितेचे कलम १८८ आणि साथरोग कायद्यान्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

जिल्ह्यात आज आढळले ९० नवे रूग्णः दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज ९० नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात औरंगाबाद शहरातील १९ आणि ग्रामीण भागातील ७१ रूग्णांचा समावेश आहे. तर आज जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे  औरंगाबाद जिल्ह्यात आज ११० जणांना (मनपा 25, ग्रामीण 85) सुटी  देण्यात आली. त्यात शहरातील २५ आणि ग्रामीण भागातील ८५ रुग्ण आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार १३२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार २०८ झाली आहे. आजपर्यंत एकूण ३ हजार ४२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या  जिल्ह्यात एकूण ६५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा