औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय कोरोना पॉझिटिव्ह

0
539
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना काल शनिवारी काहीसा ञास जाणवू लागल्याने त्यांनी आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब दिला होता. त्यांचा अहवाल आज, रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आला.

मागील पंधरा दिवसांत औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे हे प्रमुख अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर झाला आहे. माञ आयुक्त पांडेय आता हेच कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे महापालिकेचे कामकाज आणखी ढेपाळते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

 दरम्यान, पांडेय होम आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पियूष राठोडकर यांनी सांगितले की, आयुक्त पांडेय यांना काल ताप आल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी लगेच आरटीपीसीआरसाठी स्वॅब दिला. त्यांचा अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला. माञ त्यांच्यात सामान्य लक्षणे जाणवली आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही. दरम्यान आयुक्त पांडेय यांनी ट्विट करून त्यांच्या संपर्कातील सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

माझी कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्टमधील सर्व लोकांनी स्वतःला क्वारंटाइन करावे. मी रक्त चाचणी, सीटी आणि अन्य चाचण्या मेल्ट्रॉनमध्ये केल्या आहेत. लसीकरणामुळे लक्षणे अगदीच सौम्य आहेत. फुफ्फुसे आणि शरीराला फारक कमी नुकसान पोहोचले. मी घरूनच काम सुरू ठेवणार आहे, असे पांडेय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा