पन्नास टक्के कर्मचारीच कार्यालयात बोलवाः मुंबईतील खासगी कंपन्यांना निर्देश

0
31
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत कोरोनाचे सहा रूग्ण आढळल्यामुळे विशेष खबरदारी घेण्यात येत असून खासगी कंपन्यांनी ५० टक्केच कर्मचारी कार्यालयात बोलवावे, उर्वरित ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरी बसून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, असे  निर्देश बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

जगभर धुमाकुळ घालणाऱ्या कोरोना विषाणुने महाराष्ट्रात हातपाय पसरालया सुरूवात केल्यामुळे राज्य सरकारने तातडीच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. राज्यात संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा-१८९७ लागू करण्यात आला असून या कायद्यान्वये राज्य सरकारने जारी केलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भादंविच्या १८८ कलमान्वये कारवाई केली जाणार आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मुंबईतील खासगी कंपन्यांना केवळ ५० टक्केच कर्मचारी कार्यालयात बोलवा आणि उर्वरित ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा द्या, असे आदेश जारी केले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणारांविरुद्ध भादंविच्या कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्यांना लागू असणार नाही. या आदेशाची अंमलबवाजणी होते की नाही, हे पाहण्यासाठी वॉर्ड ऑफिसर कंपन्यांत जाऊन भेटी देणार आहेत. या निर्णयातून बँकिंग, टेलिफोन, इंटरनेटसेवा, रेल्वे वाहतूक, रूग्णालये, मेडिकल स्टोअर आणि फूड मार्केट यांना वगळण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा