औरंगाबादेत कोरोना रुग्णांसाठी बेड पाहिजेत? येथे करा संपर्क

0
259
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना निर्देशित केलेले आहे. शहरी भागात सीसीसी, डीसीएच आणि डीसीएचसी या उपचार सुविधांमध्ये एकुण  ६ हजार १४ खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तर ग्रामीण भागात सीसीसीमध्ये १ हजार २४४, डीसीएचसीमध्ये                                              २२५ खाटा उपलब्ध आहेत. वाढत्या रूग्णसंख्येच्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधा, खाटांची उपलब्धता प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.  

नागरिकांनी खाटांच्या उपलब्धते संदर्भात शहरी भागासाठी डॉ. बाशीत मौजूद, ९३२६७८९००७ तसेच पीयुष राठोड, ८८३००६१८४६, ८८५५८७६६५४, नियंत्रण कक्ष ८९५६३०६००७ यांच्याशी तर ग्रामीण भागातील खाटांसदर्भात डॉ. कुडीलकर यांच्याशी ९४२०७०३००८ आणि नियंत्रण कक्ष ०२४०-२९५४६१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा