जिल्हाधिकारी मैदानात, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर केली दंडात्मक कारवाई

0
91

औरंगाबादः  गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने  जिल्हा प्रशासनाने अंशतः लॉक डाऊन ची घोषणा केली. मात्र नागरिकाकडून कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने  कोरोना रुग्ण वाढत आहेत याचे गांभीर्य लक्षात घेऊन आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आज पडेगाव, कांचनवाडी, बीड बायपास रोड, शहानुरमियाँ दर्गा, गारखेडा परिसर, पुंडलीक नगर, कामगार चौक, सिडको चौक,चिकलठाणा परिसरात स्वत: विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडाची कारवाई केली. यावेळी  जिल्हाधिकारी यांनी स्वत: ध्वनीक्षेपाव्दारे नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले.

आज सकाळी जिल्हाधिकारी यांनी शहरातील काही ठिकाणी अचानक भेटी देऊन नियमांचे पालन होत आहे का नाही याची पाहणी केली. यावेळी त्यांनी गायत्री मेडिकल, नोबेल मेडिकल, दवा इंडिया मेडिकल, पटेल मेडिकल या दुकानांवरील दुकानदारांनी मास्क न घातल्याचे आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावला. तसेच शहरातील हॉटेल ३६०, पवन ट्रेडर्स, साई दुध डेअरी, अशा अनेक दुकानांवर कारवाई करत दंड वसुल केला.

आजच्या कारवाईत २४ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आल. तसेच मास्क न लावल्यास आणि उल्लघंन केल्यास दुकांनाचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जिल्हाधिकारी यांनी स्वत:  काही  मेडिकल तसेच इतर दुकानांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन ऑक्सी मीटर, थर्मल गण आहेत का याची तपासणी केली.  

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा